
64 खाणकामगारांना वाचवणाऱ्या इंजिनिअरच्या भूमिकेत अक्षय कुमार, Look Leaked
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) संदर्भात बोललं जातं की तो एका वर्षाला एक सिनेमा करतो. त्याच्या प्रत्येक सिनेमाची स्टोरी लाईन खूप वेगळी आणि हटकी असते. काही दिवसांपूर्वीच अक्षयच्या 'रक्षाबंधन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जात आहे. यादरम्यान अभिनेत्याचा आता आणखी एका सिनेमातला लूक समोर आला आहे. ज्यामध्ये खिलाडी कुमार पंजाबी व्यक्तीरेखेच्या भूमिकेत दिसत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार अक्षयच्या या सिनेमाचं नाव 'कॅप्सूल गिल' आहे.(Akshay Kumar’s first look from untitled film leaked)
हेही वाचा: 'RRR' सुपरस्टार रामचरणच्या पत्नीचा आई न होण्याचा निर्णय, कारणही केलं स्पष्ट
अक्षयच्या या सिनेमाचं कथानक इंजिनिअर जसवंत सिंग यांच्या वास्तवावादी आयुष्यावर आधारित आहे. जसवंत सिंग यांनी १९८९ मध्ये भारतातील राणीगंज इथल्या कोळशाच्या खाणीत फसलेल्या ६४ खाणकामगारांचे प्राण वाचवले होते. यामध्ये अक्षय जसवंत सिंग यांची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा इंडियन फिल्म कंपनी पूजा एंटरटेन्मेंट बनवत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुरेश देसाई यांच्यावर आहे. याआधी त्यांनी 'रुस्तम' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा: ५५ वर्षांचा शाहरुख झाला शर्टलेस, १८ वर्षांच्या पोराला लाजवेल अशी बॉडी
पूजा एंटरटेन्मेंटने या सिनेमा संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती न देता ती सीक्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला पण अक्षयच्या चाहत्यांनी त्याला हेरलं आणि सिनेमातील लूक समोर आला. प्रॉडक्शन कंपनीने शूटिंगसाठी जवळपास १०० एकरहून अधिक जमिन घेतलेली आहे. लंडनमधील या सिनेमाचं शेड्यूल ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा: KAALI Controversy: 'काली मां 'Queer',दिग्दर्शिकेचं पुन्हा वादग्रस्त ट्वीट
पूजा एंटरटेन्मेंटची यूके मध्ये शूट होणारा हा सलग तिसरा सिनेमा आहे,ज्यामध्ये अक्षय कुमार आहे. स्कॉटलॅंडमध्ये रंजीत तिवारी दिग्दर्शित हायजॅक ड्रामा बेलबॉटम हा कोरोना दरम्यान शूट झालेला सिनेमा होता. कोव्हिड नंतर रिलीज झालेला बॉलीवूडचा मोठा सिनेमा याला बोललं गेलं होतं. अक्षयच्या लंडनमधून लीक झालेल्या फोटोला पाहून प्रेक्षक मात्र एक नव्या विषयाचा सिनेमा पहायला मिळेल अशी आशा व्यक्त करताना दिसतात.
Web Title: Akshay Kumars First Look From Untitled Film
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..