Ravi jadhav shared post about Main ATAL Hoon film shooting starts from today cast pankaj tripathi release date latest update sakal
मनोरंजन

Main ATAL Hoon: शुरू हो रही है 'अटल' कहानी! रवी जाधवनं पोस्ट करत दिली गुड न्यूज..

पंकज त्रिपाठीला घेऊन रवी जाधवनं केला मुहूर्त, म्हणाला..

नीलेश अडसूळ

Atal Bihari Vajpayee Biopic pankal tripathi shooting starts : भारताचे माजी पंतप्रधान, एक मितभाषी नेतृत्व, कवी, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र अशी ज्यांची ख्याती आहे. अशा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे.

मराठी दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे नाव जाहीर झाले त्यानंतर अटलजींच्या जयंती निमित्त या चित्रपटातील पंकज त्रिपाठीचा अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपातील फर्स्ट लुक समोर आला होता.

आज या चित्रपटाबाबत आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

(Ravi jadhav shared post about Main ATAL Hoon film shooting starts from today cast pankaj tripathi release date latest update)


''मै अटल हू.. असे या चित्रपटाचे नाव असून आज या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. रवी जाधव यांनी एक फोटो पोस्ट करत आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याची माहिती दिली. चित्रीकरणा आधी पूजा केलेला फोटो शेयर करत एक सुंदर कॅप्शन रवी जाधव यांनी दिले आहे. ''जिसने बुझते उम्मीदों में क्रांति की लौ जलाई, शुरू हो रही है ऐसी 'अटल' कहानी!'' असं रवी जाधव म्हणाले आहेत.

तर अटलजींची भूमिका साकरणाऱ्या अभिनेता पंकज त्रिपाठी ने देखील एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये रवी जाधव आणि पंकज एकत्र आहेत. ''श्री अटल बिहारी वाजपेयी जी' जैसे महानुभाव व्यक्तित्व को साकार करने का अवसर मिला है, मुझे आशा है मैं इस महान व्यक्तिमत्व को न्याय जरूर दूंगा!'' अशी पोस्ट पंकज यांनी शेयर केली आहे.

हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याचित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करत आहेत तर लॉरेन्स डी कुन्हा सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आली नसली तरी डिसेंबर 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे बोलले जात आहे.'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अ‍ॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे.

रवी जाधव यांनी कालच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये बालगंधर्व चित्रपटातील काही फोटो त्यांनी शेयर केले होते. त्यांनी लिहिलं होतं की,"उद्या तब्बल 12 वर्षांनी माझ्या दुसऱ्या 'बायोग्राफीकल' चित्रपट 'मैं अटल हूँ'च्या चित्रीकरणाला प्रारंभ होत आहे. असाच आशीर्वाद असावा".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT