Riteish Deshmukh Video On Ganesh Chaturthi 2023 Esakal
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2023: रितेश-जेनिलियाची मुलं 'लई भारी'! 'रिसायकल बाप्पा' बनवत गायलेल्या आरतीने नेटकरीही थक्क

Vaishali Patil

Riteish Deshmukh Video On Ganesh Chaturthi 2023: आज गणेश चतुर्थी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी विराजमान झाले आहेत. 10 दिवस आता बाप्पा आपल्या लाडक्या भक्ताच्या घरी राहतील. सर्वसामान्यांपासून तर बॉलिवूड स्टारपर्यंत सर्वच मोठ्या थाटामाटात बाप्पाला अपल्या घरी आणतात.

दरम्यान अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी देखील थाटामाटात गणपती बाप्पा आपल्या घरी आणला मात्र यावेळी त्यांनी असं काही केलं की नेटकरी थक्क झाले आहेत.

रितेश आणि जिनिलिया या दोघांनी मुलांवर खुप चांगले संस्कार केले आहेत. आता रितेश आणि जिनिलिया यांची मुलं रिआन आणि राहील यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. रितेशने त्याच्या दोन्ही मुलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओत रितेशची मुलं रिआन आणि राहील दोघेही गणरायाची आरती म्हणतांना दिसत आहे. त्याचबरोबर या दोघांनी खास गणपती बाप्पादेखील तयार केला आहे.

या व्हिडिओ रितेश आणि जिनिलिया, रिआन आणि राहील आणि बाकी मंडळी भंगाराला रिसायकल करुन त्याद्वारे बाप्पा बनवत आहेत. इतकच नाही तर या व्हिडिओत रिआन आणि राहील गणरायाची 'सुख करता दुख हर्ता, वार्ता विघ्नाची' पुर्ण आरती देखील म्हणत आहेत. व्हिडिओच्या शेवटी सुंदर गणरायाची प्रतिमा देखील ते तयार करतात.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रितेश लिहितो, गणपती बाप मोरया !! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! दरवर्षी आपण स्वतःचा इको फ्रेंडली गणेश बनवतो. रियान आणि राहिल यांचा आग्रह आहे की आम्ही भंगारातून रिसायकल केलेला बाप्पा बनवतो!!! हे एकत्र करण्यात आम्हाला खूप छान वेळ मिळाला..."

देशमुख कुटूबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा नेटकरी रिआन आणि राहीलचे फॅन झाले आहेत. व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्यांनी रिआन आणि राहीलचं खुप कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT