rubina dilaik first reaction after his accident bigg boss  SAKAL
मनोरंजन

Rubina Dilaik Accident: मला जबर धक्का बसलाय, अपघातानंतर रुबीना दिलकची वाईट अवस्था

अपघाताला बळी पडलेल्या रुबिनाची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

Devendra Jadhav

Rubina Dilaik Health Update News: मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक हिचा अपघात झाल्याची बातमी सकाळी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांना रुबिनाच्या प्रकृतीविषयी काळीज वाटली.

रुबिनाच्या गाडीला मोठी धडक बसली असून तिच्या पतीने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

या अपघाता संदर्भात रुबिनाचा पती म्हणजेच अभिनेता अभिनव शुक्लाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आता या अपघाताला बळी पडलेल्या रुबिनाची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

(rubina dilaik first reaction after his accident)

रुबिना दिलैकने 11 जून रोजी सकाळी 9 च्या सुमारास ट्विट केले. यामध्ये तिने पती अभिनव शुक्ला यांची पोस्ट रिट्विट करून तिच्या हेल्थ अपडेट दिली.

त्यांनी लिहिले की, 'अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. सध्या मी शॉकमध्ये आहे. पण आमची वैद्यकीय चाचणी झाली, सर्व काही ठीक आहे...

निष्काळजी ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई झाली असली तरी नुकसान झाले आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही आमच्या आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याचे नियम पाळा! अशो पोस्ट रुबिना दिलैकने केलीय.

विशेष म्हणजे या अपघतात रुबिनाला कोणीतही इजा झालेली नाही. काही तासांपुर्वी अभिनवने रुबीनाची प्रकृती ठीक असल्याचेही सांगितले आहे. मात्र रुबिनाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असल्याने तिच्या अपघताच्या बातमीने तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

अभिनव शुक्लाने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये अपघात झाल्यानंतरचे गाडीचे फोटो शेयर केले आहेत. सोबत लिहिले आहे की, 'जे आमच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं. फोनवर बोलत ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. याबाबत सविस्तर माहिती मी देईनच..'

'या अपघातावेळी रुबिना गाडीतच होती, पण सध्या ती ठीक आहे. तिला उपचारांसाठी डॉक्टर कडे घेऊन गेलो होतो. पण माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की, या अपघातातील दोषींवर कठोर कारवाई करावी.' आता रुबिना या अपघातातुन लवकरात लवकर बरी व्हावी म्हणुन तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT