sairat fame tanaji galgunde 
मनोरंजन

'सैराट'मधील बाळ्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

सकाळ ऑनलाइन

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटातील परश्याचा मित्र बाळ्या अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जितकं प्रेम आर्ची आणि परश्याच्या भूमिकांना मिळालं, तितकंच प्रेम परश्याच्या मित्रांच्या भूमिकेला मिळालं. आता हाच बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. झी टॉकीज प्रस्तुत 'गस्त' या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

या नवीन भूमिकेबद्दल तानाजी म्हणाला, "मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांची प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका साकारतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे."

गेल्या वर्षी झी टॉकीजने ३ टॉकीज ओरिजनल चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर केली आणि यावर्षी ही वाहिनी 'गस्त' हा चित्रपट घेऊन आली आहे. सैराटनंतर पुन्हा एकदा तानाजी मोठ्या पडद्यावर अभिनय करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच या चित्रपटात इतर काही जबरदस्त कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Sea tension: लाल समुद्रात इस्रायली जहाजांना बंदी! हूती बंडखोरांचा मोठा निर्णय; दिसताच हल्ला करण्याची धमकी

IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा विजय; पदार्पणवीर मानव सुतारसह वॉशिंग्टन सुंदर चमकले

Mumbai: मुंबईतील विहार तलावाला पौर्तुगीजकालीन इतिहास, पावणेचारशे वर्षांपूर्वीचे अवशेष अजूनही जिवंत

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

MSRTC Bus Trouble: दे धक्का! ४५ किमी प्रवासात लालपरी ५-६ वेळा बंद पडली, प्रवाशांवरच ढकलण्याची वेळ

SCROLL FOR NEXT