esakal | शाहरुखपासून दीपिकापर्यंत.. अनुष्काच्या वामिकासाठी सेलिब्रिटींनी पाठवले 'हे' महागडे गिफ्ट्स
sakal

बोलून बातमी शोधा

vamika gifts

'विरुष्का'च्या वामिकाला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची सध्या जोरदार चर्चा आहे. 

शाहरुखपासून दीपिकापर्यंत.. अनुष्काच्या वामिकासाठी सेलिब्रिटींनी पाठवले 'हे' महागडे गिफ्ट्स

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ जानेवारी रोजी मुलीला जन्म दिला. पती विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. विराट-अनुष्काच्या घरी लहान पाहुणीचं आगमन होताच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी भेटवस्तू पाठवल्या. 'विरुष्का'च्या वामिकाला मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची सध्या जोरदार चर्चा आहे. 

अनुष्काने किंग खान शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटात या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अनुष्का मुलगी झाल्याचे कळताच शाहरुखने बाहुल्यांचं मोठं घर भेटवस्तू म्हणून पाठवलं. 'न्यूज नेशन'ने दिलेल्या माहितीनुसार, या बाहुलीघराची किंमत जवळपास ७० हजार रुपये इतकी आहे. तर दीपिका पदुकोणने जवळपास एक लाख ८० हजार रुपयांची सोन्याची चैन भेट म्हणून पाठवली. 

हेही वाचा : या चिमुकल्याला ओळखलंत का? माधुरीशी आहे खास कनेक्शन

शाहरुखप्रमाणेच सलमाननेदेखील वामिकासाठी बाहुल्यांचं घर खरेदी केलं असून त्याची किंमत जवळपास एक लाख रुपये असल्याचं म्हटलं जातंय. ऐश्वर्या राय बच्चनने अनुष्कासाठी महागड्या चॉकलेट्सचा बॉक्स पाठवला. ऐश्वर्या आणि अनुष्काने 'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तर बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षय कुमारने वामिकासाठी सोन्याचे पैजण भेट म्हणून पाठवले. आमिर खानने जवळपास १ लाख ७० हजार रुपयांचा पाळणा वामिकासाठी दिला. 

हेही वाचा : अक्षयचा सूर्यवंशी या तारखेला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित

११ जानेवारी रोजी मुलीच्या जन्मानंतर विराट व अनुष्काने वामिकासोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर १ फेब्रुवारी रोजी पोस्ट केला. याचवेळी दोघांनी मुलीचं नाव जाहीर केलं. 'वामिका' असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिताच सोशल मीडियावर हे नाव ट्रेण्ड होऊ लागलं. वामिका हे देवी दुर्गेचं एक नाव आहे. 

loading image