Salaar Twitter Review:  Esakal
मनोरंजन

Salaar Twitter Review: दोन टोकाच्या दोन प्रतिक्रिया! नेटकऱ्यांना प्रभासचा 'सालार' कसा वाटला? एकदा वाचाच!

सालारचा पहिला शो मध्यरात्री 1 वाजता उशिरा सुरू झाला होता.

Vaishali Patil

Salaar Twitter Review: काल शाहरुख खानचा डंकी चित्रपटगृहात रिलिज झाला अन् आज साउथ स्टार प्रभासचा सालार 22 डिसेंबर रोजी जगभरात रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतिक्षा करत होते. आज अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सालारची क्रेझ चाहत्यांमध्ये पहिल्याच दिवशी दिसत आहे.

चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. सालारचा पहिला शो मध्यरात्री 1 वाजता उशिरा सुरू झाला होता. आता प्रेक्षक आणि प्रभासच्या चाहत्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू आता सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

ज्या प्रेक्षकांनी हा शो फर्स्ट डे फर्स्ट पाहिला त्यांनी सालार चित्रपटाचे तोंड भरुन कौतुक केले आहे. चित्रपट रिलीज होताच काहींनी सालार चित्रपटाला अल्ट्रा ब्लॉकबस्टर घोषित केले आहे.

चाहते प्रभासच्या सालारला थ्रिलर आणि ड्रामाने भरलेला असल्याचे सांगत आहे. प्रशांत नीलच्या चित्रपटाबाबत ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत यावर नजर टाकूया...

सोशल मीडियावरील एकाने सालारच्या पहिला अर्ध्या भागाने मला गुसबंप्स दिले आहे. चित्रपटाला अल्ट्रा ब्लॉकबस्टर आहे तर दुसर्‍याने सांगितले की भाग 2 साठी चांगला सेटअप केला गेला आहे, बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपये लोड केले जात आहेत.

चित्रपटात भरपूर अॅक्शन, सरप्राईज, ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. हा एक मास चित्रपट आहे. प्रभासने दमदार अभिनय केला आहे. पूर्ण पैसा वसूल चित्रपट आहे.

तर एकाने लिहिले की, भारतीय सिनेमाचं हे सर्वात मोठे कमबॅक आहे. सगळे रेकॉर्ड मोडले जातील. एका चाहत्याने लिहिले की, 'सालार' हा चित्रपट पाहावा. अजिबात चुकवू नका. थिएटरमध्ये अवश्य पहा.

तर एका यूजरने लिहिले की, 'मला प्रभासच्या चित्रपटांची आठवण करून देऊ नकोस भावा... इतका हास्यास्पद चित्रपट कोणी कसा बनवू शकतो... प्रभासचे सर्व चित्रपट हास्यास्पद असले तरी हा सिनेमा पाहिल्यानंतर अल्ट्रा प्रो मॅक्स हसू येत आहे.'

ट्रेड विश्लेषक मनोबाला व्ही यांनी देखील प्रभास, प्रशांत आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या पृथ्वीराज सुकुमारनचे कौतुक करणारा चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

प्रभास व्यतिरिक्त सालारमध्ये पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू आणि श्रुती हासन सारखे स्टार्स देखील आहेत. हा सिनेमा देशभरात 6 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

Yerawada Fire Station Darkness : येरवड्यातील अग्निशमाक केंद्र अंधारात; चार दिवसांपासून वीज पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT