Salman Khan: आनंद पंडितच्या बर्थडे पार्टीत सलमानने असं काही केलं की लोकांना आली ऐश्वर्याची आठवण, व्हिडीओ व्हायरल

आनंद पंडितच्या बर्थडे पार्टीत सलमान खानच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं
Salman Khan At Anand Pandit's birthday party hug abhishek bachchan and amitabh
Salman Khan At Anand Pandit's birthday party hug abhishek bachchan and amitabh SAKAL

Salman Khan - Abhishek Bachchan Viral Video: मनोरंजन जगतातील एक यशस्वी निर्मात्यांपैकी एक आनंद पंडित यांनी २१ डिसेंबरला रात्री त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त एका शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत मनोरंजन विश्वातील अनेकदिग्गजांनी आपली उपस्थिती नोंदवली. पार्टीत सलमानने केलेल्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे लोकांना मात्र ऐश्वर्याची आठवण आली.

Salman Khan At Anand Pandit's birthday party hug abhishek bachchan and amitabh
Dunki Review: राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा 'डंकी' पाहायचा प्लॅन करताय? वाचा हा रिव्ह्यू

आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सर्व कलाकार एकाच छताखाली एकत्र आले. या पार्टीत अमिताभ - अभिषेक बच्चन सुद्धा सहभागी होते. याशिवाय बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सुद्धा पार्टीत आला होता.

या पार्टीत सलमान खान अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना मिठी मारताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा बिग बी आणि अभिषेक बच्चन स्टेजवर उभे राहून वाढदिवस साजरा करत आहेत. सोनू निगमचा परफॉर्मन्स झाला तेव्हा सलमान खान आणि साजिद नाडियादवाला स्टेजवर गेले. त्यावेळी सलमान खानने अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना मिठी मारली. इतकंच नाही तर अभिषेक आणि सलमानमध्ये मस्त गप्पा रंगल्या.

सांगायचं झालं तर, जेव्हापासून अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं, तेव्हापासून अभिषेक आणि सलमान हे दोघेही प्रत्येक प्रसंगात एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले. अभिषेकच्या लग्नानंतर सलमानने अभिषेकसोबत बोलण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.

सर्वांना माहितच आहे की, सलमान आणि ऐश्वर्या कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते पण त्यांचं ब्रेकअप झालं. सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले, त्यापैकी एक म्हणजे विवेक ओबेरॉय. विवेकने सलमानवर आरोप केला होता की, अभिनेत्याने त्याचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली होती. विवेकसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि त्यानंतर दोघांनी एंगेजमेंट करून लग्न केले. अभिषेक आणि ऐश्वर्याला आराध्या नावाची एक लाडकी मुलगी आहे. पण दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. आणि त्यातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांनी कमेंट करुन ऐश्वर्याची आठवण काढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com