Salman Khan_Salim Khan 
मनोरंजन

सलीम आणि सलमान खान पितापुत्राला जीवे मारण्याची धमकी!

वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान या पिता-पुत्राला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळं खळबळ उडाली असून याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. (Salman and Salim Khan threatened with death)

सूत्रांच्या माहितीनुसार, सलिम खान सकाळी जॉगिंगला गेले असताना एका बाकड्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते. या बाकड्यावर धमकीचं पत्र ठेवलेलं होतं. यामध्ये सलमान खान आणि सलीम खान यांची पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणं मारण्यात येईल, असं म्हटलं आहे.

दरम्यान, सलमान खानचं घर आणि ज्या ठिकाणी हे धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या सीसीटीव्हीतून जे कोणी संशयित आरोपी सापडतील त्यांना बोलावून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

पंजाब पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर लगेचच गायक मुसेवाला यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्यांचा वर्षावर करत हत्या केली होती. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या या घटनेमुळं सलमान आणि त्याच्या वडिलांनी मिळालेल्या धमकीकडं पोलीस गांभीर्यानं पाहतं असून कसून तपास केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT