कोरोनानं आई-वडील गेले, बोर्डात टॉप केलं पण...;LIC नं आणलं नाकीनऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vanisha Pathak
कोरोनानं आई-वडील गेले, बोर्डात टॉप केलं पण...;LIC नं आणलं नाकीनऊ

कोरोनानं आई-वडील गेले, बोर्डात टॉप केलं पण...;LIC नं आणलं नाकीनऊ

भोपाळ : एखाद्याचं जीवन किती वाईट क्षणांनी आणि आव्हानांनी भरलेलं असू शकतं याचं एक उदाहरण भोपाळमधील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीबाबत पहायला मिळालं आहे. वनिषा पाठक नामक या विद्यार्थीनीनं कोरोनामुळं आपले आई-वडील गमावले, दहावीच्या परीक्षेत बोर्डात टॉप केलं. पण तिच्या नशिबी कर्जाचं ओझं आलं. या विद्यार्थीनीला होमलोनसाठी एलआयसीनं नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिल्यानं खळबळ उडाली आहे. (Orphaned topper from Bhopal faces loan recovery notices)

हेही वाचा: गालांना रंग, गळ्यात हात... राऊतांनी शेअर केली 'काश्मीर फाईल्स'ची स्टारकास्ट

वनिषा पाठकचे वडील जितेंद्र पाठक हे एलआयसी एजन्ट म्हणून काम करत होते. त्यांनी एलआयसीमधूनच होमलोन घेतलं होतं जेव्हा त्यांची मुलगी वनिषा ही अल्पवयीन होती. पण त्यांच्या मृत्यूनंतर एलआयसीनं त्यांचे दरमहा मिळणारे सर्व बचतीचे पैसे आणि कमिशन ब्लॉक केले. वनिषानं होमलोनच्या परफेडीबाबत अनेकदा संबंधीतांशी पत्र व्यवहार करुन आपल्याला काही काळ वेळ मिळावा अशी विनंती केली. पण एलआयसीनं त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही.

हेही वाचा: राज्यसभेसाठी भाजपने पहिला डाव टाकला, केंद्रीय मंत्री मुंबईत

वनिषा ही सध्या १७ वर्षांची आहे तिला एक लहान भाऊ देखील आहे. पण एलआयसीनं तिला वारंवार होमलोनच्या परफेडीसाठी नोटीसा पाठवल्या आहेत. लोनची परफेड न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यातून देण्यात आला आहे. तिला २ फेब्रुवारी २०२२ रोजी शेवटची नोटीस आली होती यामध्ये तिला २९ लाख रुपये परत करण्याची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग, ताप आल्याने विश्रांती घेणार

वनिषा पाठक आणि तिच्या ११ वर्षांच्या भावाचा सांभाळ सध्या तिचे मामा प्रा. अशोक शर्मा करत आहेत. त्यांनी म्हटलं की, मी या दोन्ही मुलांची काळजी घेत आहे. तिच्या वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायला आमच्याकडे पुरेसे पैसेही नाहीत. वनिषाचे वडील जितेंद्र हे एलआयसीचे मोठे एजंट होते त्यामुळं त्यांच्या आमच्या पत्रव्यवहारांना ते प्रतिसाद देतील अशी आशा होती. पण एलआयसीनं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे.

Web Title: Orphaned Topper From Bhopal Faces Loan Recovery Notices

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bhopalDesh news
go to top