Salman Khan Tiger 3 Fans Burst Firecrackers At Tiger Entry In Theatres How Salman Khan Responded SAKAL
मनोरंजन

'टायगर 3' सिनेमा दरम्यान फोडले फटाके आता सलमाननं चाहत्यांना फटकारलं!

Vaishali Patil

Salman Khan Responded: बॉलिवूड भाईजान सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट मोस्ट अवेटेड चित्रपट होता. 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर 'टायगर 3' चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सलमानचे चाहते या चित्रपटासाठी खुपच उत्सुक होते. चाहत्यांनी थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मात्र त्यात एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात सलमानच्या चाहत्यांनी कहरच केला.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील हा व्हिडिओ आहे. जो X प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला होता. यात सलमानच्या चित्रपटाचा आनंद घेताना चाहत्यांनी थेट हॉलमध्ये फटाके फोडले.

काही मिनिटातच चाहत्यांनी हॉलमध्ये फटाक्याची आतषबाजी झाली आणि सर्वत्र पळापळ सुरु झाली. चाहत्यांनी चित्रपटाचा आनंद साजरा करताना चित्रपटगृहातच रॉकेट उडवले आणि फटाके फोडले.

आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थेट सलमान खानने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत चाहत्यांना चेतावणी दिली आहे.

सलमान खानने सिनेमा हॉलमध्ये फटाके फोडण्याच्या घटनेची दखल घेत सोशल मिडियावर लिहिले की, "मी टायगर 3 चित्रपट चालू असताना थिएटरमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याचं ऐकलं. हे धोकादायक आहे. स्वतःला आणि इतरांना धोका न देता चित्रपटाचा आनंद घेऊया. सुरक्षित रहा."

तर दुसरीकडे या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही चाहत्यांवर टीका केली आहे.

फटाक्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मोहन थिएटरवर छावणी पोलिस ठाण्यात कलम ११२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे.

दिग्दर्शक मनीष शर्माचा 'टायगर 3' हा एक अॅक्शन थ्रिलर आहे ज्यामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत तर रेवती, सिमरन, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा, रणवीर शौरे आणि आमिर बशीर हे देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अघोरी पूजेसाठी महिलाही शोधायच्या सावज; १६ संशयितांना नोटीस, चंद्रपूरमधील प्रकार, 'सकाळ'ने उघडकीस आणलं प्रकरण

Narasimha Jayanti 2026 : श्रद्धा, धैर्य आणि न्यायाचं प्रतीक असलेली नृसिंह जयंती; जाणून घ्या तारीख, कथा आणि साजरी करण्याची पद्धत

Latest Marathi News Live Update : सांगलीत आईच्या खूनप्रकरणी मुलाला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Beed News: पशुसंवर्धन योजनांची मोठी पुनर्रचना; नव्या स्वरूपात मिळणार जनावरांसाठी लाभ; जिल्ह्यातील पशुपालकांना; डीबीटीद्वारे थेट अनुदान

Marathwada News: जायकवाडी धरणावर बाष्पीभवनाचे संकट; तापमान वाढीच्या इशाऱ्याने पाण्याची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT