Salman Society Trailer
Salman Society Trailer esakal
मनोरंजन

Salman Society Trailer : अनाथ मुलांच्या शिक्षणाची धडपड मांडणारा सलमान सोसायटी! ट्रेलर पाहून येईल रडू

Monika Lonkar –Kumbhar

Salman Society Trailer : सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून ‘सलमान सोसायटी’ या चित्रपटाची भलतीच चर्चा होताना पहायला मिळत आहे. या सिनेमाची ३ गाणी देखील नुकतीच रिलीज झाली. या गाण्यांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून आज या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियवर रिलीज करण्यात आला आहे.

सलमान सोसायटी या सिनेमाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केले आहे. या सिनेमातून भटक्या, अनाथ, मुलांची व्यथा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या टीमने केला आहे. ‘सलमान सोसायटी’ हा सिनेमा १७ नोव्हेंबर २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर

सिनेमाच्या ट्रेलरमधून इमोशनल ड्रामा आणि कॉमेडी सिन्सची झलक पहायला मिळत आहे. एकूणच हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांवर भाष्य करतो. ट्रेलरमधून सिनेमातील लहान मूलांची शिक्षणासाठी सुरू असलेली धडपड लक्ष वेधून घेतेयं.

‘भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल’ या टॅगलाईनवर सिनेमा आधारित आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी सिनेमाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी आणि सिनेमाची निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे, वैशाली चव्हाण यांनी केली आहे. हा सिनेमा प्राजक्ता एंटरप्रायझेसच्या बॅनर अंतर्गत तयार करण्यात आला आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट

या सिनेमात प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता गौरव मोरे हा एका वेगळ्याच मात्र महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

हरहुन्नरी अभिनेता उपेंद्र लिमये या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने इत्यादी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT