sankarshan karhade marathi fan meet at dallas us teen adkun sitaram amhi sare khavayye  SAKAL
मनोरंजन

Sankarshan Karhade: "प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत आल्या अन्", संकर्षणच्या आयुष्यातला गोड क्षण

संकर्षणला नाटकाच्या प्रयोगानंतर एक खास फॅन भेटायला आल्या, बघा काय घडलं?

Devendra Jadhav

Sankarshan Karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातला चर्चेतला अभिनेता. संकर्षणने आजवर अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.

संकर्षण मालिका, नाटक, सिनेमा, निवेदन, कविता अशा प्रत्येक कलाक्षेत्रात यशस्वी कामगिरी करत आहे. संकर्षण अनेकदा त्याचे आयुष्यातले अनुभव सोशल मिडीयावर शेअर करत असतो. असाच एक गोड अनुभव संकर्षणने सोशल मिडीयावर शेअर केलाय. बघा काय घडलं.

(sankarshan karhade marathi fan meet at dallas us)

संकर्षणने एका आजीसोबतचा फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करुन संकर्षण लिहीतो, “माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण…” आज अमेरिकेतला डॅल्लस चा प्रयोग जोरदार झाला.. प्रयोगानंतर एक काकु काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव “उत्तरा दिवेकर”
ह्या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबाग ला मी २०११ साली माझा “आम्ही सारे खवय्ये” चा पहिला भाग शूट केला होता..

संकर्षण पुढे लिहीतो, "योगायोगाने त्या सिजन चं नाव होतं “आई मला भूक लागलीये”.. आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” ईतकं भरून आलं मला …. कलाकाराला काय हवंय..? हेच .. हेच.."

संकर्षण शेवटी लिहीतो, "आज १२ वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय…. ”खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली , अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक “आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत. आणि आज “नियम व अटी लागू नाटकाच्या निमित्ताने भेट झाली …. THANK YOU THANK YOU"

आणि शेवटी संकर्षणने तीन अडकून सीताराम बघण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलंय. संकर्षणचा तीन अडकून सीताराम सिनेमा आज २९ सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. या सिनेमात संकर्षण सोबत प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, हृषिकेश जोशी असे कलाकार झळकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT