मनोरंजन

यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण आहेत डिस्टर्ब

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊन हा गरजेचा होता. तो सर्वांनी पाळला. आता अनलॉक 1 सुरु झालेले आहे. या काळात अनेक उद्योग व्यवसाय सुरु झाले आहेत. यामध्ये अद्याप जिम (व्यायामशाळा ) सुरु झालेल्या नसल्याने युवकांचा हिरमोड झाला आहे. कोरोनावर अद्याप कोणत्याही प्रकारचे औषधच सापडलेले नाही. तरी देखील आपण या रोगावार मात करु शकतो. ते म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवून असा विश्वास व्यक्त करीत मुळशी पॅटर्न फेम प्रवीण तरडे या अभिनेत्याने सरकारला जिम सुरु करण्याची विनंती केली आहे. तरडे यांनी केलेला विनंती वजा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात युवा वर्ग व्हायरल करुन सरकारला जिम सुरु करण्याचे आवाहन करीत आहे. 

प्रवीण तरडे म्हणात जिम बंद झालेली आहे. जर तुम्ही आम्ही उत्तम आरोग्य राखले, आहार उत्तम घेतला तर कोरोनाशी लढू शकणार आहे. जिम उघडणे गरजेचे आहे.  काळजी घ्या. नियम लावा. वेगवेगळे नियम काढा. परंतु जिम या सुरु झाल्या पाहिजेत. मी आणि मिस्टर इंडिया महेश आगवणे आम्ही गेली चार ते पाच वर्ष एकत्र व्यायाम करीत आहे. याबरोबरच आमचे स्नेही श्रीपाद चव्हाण हे देखील बराेबर असतात. आमच्या सर्वांच्या चर्चेतून एक मुद्दा पूढे आला तो म्हणजे जिम सुरुच झाली पाहिजे. याचे प्रमुख कारण म्हणजे व्यायामाने माणूस ताजा तवाना होत असतो. दूसरे म्हणजे जिम व्यावसायावर अवलंबून असलेले अनेक कुटुंब आहेत. जिम प्रशिक्षक आहेत. सफाई कामगार आहेत.  

त्याचबरोबर पिळदार शरीर करण्यासाठी धडपत असलेले, मेहनत घेणारे आपल्या महाराष्ट्रातील लाखो तरुण आहेत. त्या सर्वांना जिम सुरु व्हावी असे मनाेमन वाटत आहे. पण जिम बंद असल्याने ते सर्वजण डिस्टर्ब झाले आहेत. त्यांच्यावतीने मी सरकारला विनंती करतो लवकरात लवकर जिम सुरु करा. कारण आता हीच एक आशा राहिलेली आहे कोरोनाशी लढण्याची. तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. तुमची ताकद वाढवा. तुमची शरीरयष्टी वाढवा सोबत महाराष्ट्र घडवा असेही तरडे यांनी नमूद केले आहे.

दहावीनंतर काय? विनामुल्य वेबिनारचे आयोजन  

पैसे परत मिळण्याचा त्यांचा हक्कच : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT