दहावीनंतर काय? विनामुल्य वेबिनारचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

सकाळ आणि दिशा ऍकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने "दहावीनंतर काय?' याविषयावर विद्यार्थींसाठी विनामूल्य वेबिनार रविवार (ता. 21, जून) सकाळी  11 वाजता Zoom App वर (झूम ऍपवर) आयोजिले आहे. इच्छुकांनी 7775925923/7775024445 येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने केले आहे.

सातारा: सकाळ आणि वाईतील दिशा ऍकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने "दहावीनंतर काय?' याविषयावर विद्यार्थींसाठी विनामूल्य वेबिनार रविवार (ता. 21, जून) सकाळी  11 वाजता Zoom App वर (झूम ऍपवर) आयोजिले आहे. या वेबिनारमध्ये शिक्षण क्षेत्रात गेली 18 वर्ष अव्याहतपणे कार्यरत असलेल्या वाईच्या दिशा ऍकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम हे मार्गदर्शन करणार आहेत..

मार्च मधील 10 वीच्या परीक्षा झाल्या, की जून महिन्यात लगबग सुरू होते करिअर घडविण्याच्या दृष्टीने पुढील प्रवेशाची. मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्‍चर, डिफेन्स या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेले विद्यार्थी इयत्ता अकरावी, बारावीसाठी वाईतील दिशा ऍकॅडमीला नेहमीच पसंती देतात. याचे प्रमुख कारण म्हणजे येथे स्पर्धा परीक्षांची सर्वोत्तम तयारी करून घेतली जाते. त्यासाठी सर्व अत्याधुनिक सोईसुविधा येथे उपलब्ध आहेत. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक, मेस, हॉस्टेल सुविधा आणि गेली 18 वर्षांपासून सातत्याने उंचावत जाणारी यशाची परंपरा ही दिशा ऍकॅडमीची ठळक वैशिष्ट्ये. शहरातल्या गर्दीपासून दूर, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल, असे वातावरण असलेली दिशा ऍकॅडमी केवळ अभ्यासच नव्हे, तरी प्रत्येक विद्यार्थ्याचे शारीरिक व मानसिक पातळीवरील भरणपोषण काटेकोरपणे करते. त्यासाठी कौन्सिलिंग, हेल्दी डाएट प्लॅन, योगा, व्यायाम, खेळ, आरोग्य व सुरक्षेच्या सर्व मानदंडाचे पालन यावर दिशा ऍकॅडमीचा भर असतो. आपल्या या वेगळेपणामुळे मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील विद्यार्थी दिशा ऍकॅडमीलाच पहिली पसंती देतात.

यंदाच्या वर्षी मात्र कोरोना संकटाच्या अभूतपूर्व परिस्थितीत सारेच जण धास्तावले आहेत. एकीकडे जगाच्या, समाजाच्या भविष्यातील गरजूंनी कुस बदली आहे, तर भविष्यातील करिअरच्या संधी कोणत्या आहेत, कसे असेल शिक्षण असे कितीतरी प्रश्न मनात पिंगा घालत आहेत. विद्यार्थी व पालकांच्या मनातील अनेक शंकांचे समाधान करण्यासाठी सकाळ आणि दिशा ऍकॅडमी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने "दहावीनंतर काय?' याविषयावर विनामूल्य वेबिनार रविवार दिनांक 21 जून रोजी, सकाळी 11 वाजता Zoom App वर (झूम ऍपवर) घेण्यात येणार आहे. यात वाईच्या दिशा ऍकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम हे मार्गदर्शन करणार आहेत.करिअर मार्गदर्शन वेबिनार तीन भागांत होणार असून, पहिल्या भागात दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी?, दूसरा भाग हा करिअरची निवड करताना ऍपटिट्यूड टेस्ट ( Aptitude Test) चे काय महत्त्व आहे? आणि तिसरा भाग इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्‍चर, डिफेन्स कोर्सच्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, कॉलेजेस व ब्रॅंचेस याबद्दल माहिती देणारा असेल. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे, प्रश्‍नांचे समाधान केले जाणार आहे. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्‍यक आहे. इच्छुकांनी 7775925923/7775024445 येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What after X'th ?