sayaji shinde 
मनोरंजन

Exclusive: "शिवजयंतीला गडावर लावणार हिरव्या मशाली"; सयाजी शिंदेंचा निर्धार

स्वाती वेमूल

सुप्रसिद्ध अभिनेते व पर्यावरणवादी सयाजी शिंदे हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी करणार आहेत. महाराजांच्या पाच गडांवर ४०० हिरव्या मशाली लावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत असून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आहे. मिरवणूक काढून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन लोकांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 'सकाळ ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा समजावून सांगितली. 

"४०० झाडं लावणं काही सोपं नाही. यासाठी समविचारी लोकांना, वृक्षांवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणलं. कोणती झाडं लावावीत, त्यांच्या पाण्याची सोय आणि इतर काही बाबींची तयारी त्यांनी केली. आता शिवजयंतीला वृक्षारोपण करून दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येईल. जेणेकरून महाराजांच्या गडकिल्ल्यांना शोभा येईल आणि पर्यावरणासाठी खऱ्या अर्थाने काम होईल", असं ते म्हणाले. 

काय आहे हिरव्या मशालींची संकल्पना?
"एक असते पेटती मशाल आणि झाडं म्हणजे हिरव्या मशाली, जे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. पेटती मशाल विझते पण हिरवी मशाल वर्षानुवर्षे जिवंत राहते. माझ्या मते श्रीमंतपणाची व्याख्या म्हणजे तुम्ही चांगलं ऑक्सिजन जोपर्यंत घेऊ शकता तोपर्यंत तुम्ही श्रीमंत आहात. तुमच्याकडे कितीही संपत्ती असली आणि ऑक्सिजन नसेल तर तुम्ही संपलात. पण आपण या वृक्षांचं महत्त्वच विसरलो आहोत. यासाठी मिरवणूक काढून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन लोकांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देणार आहोत. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका, असं महाराजांनीच म्हटलं होतं. आम्ही केवळ त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. ही मोहीम हाती घेण्यापूर्वी झाड मनात लागलं पाहिजे," अशा शब्दांत त्यांनी मोहिमेचं काम समजावून सांगितलं. 

वृक्षारोपणाचं काम कसं पूर्ण केलं जाईल?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाच गडांवर ४०० वृक्षांची लागवड केली जाईल. यासाठी त्या त्या गडावर काम करण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. सयाजी शिंदे स्वत: पन्हाळगड आणि इतर दोन-तीन गडांवर जाऊन वृक्षारोपण करणार आहेत. पन्हाळगडावर शिवराष्ट्र मंडळ, पन्हाळ नगरपालिका आणि शिवराष्ट्र मंडळ, पन्हाळ नगरपालिका आणि एका कंपनीने जबाबदारी घेतली आहे. सदाशिवगडावर डॉ. योगेश कुंभार कार्यरत असतील, वसंतगडावर दिनेश कदम हातभार लावतील तर दौलताबाद किल्ल्यावर पोपट रसाळ कामात मदत करतील, असं त्यांनी सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT