Shah Rukh Khan bollywood Actor esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan : 'तो फक्त लोकांचा वापर करुन घेतो अन्...' बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकाचा शाहरुखवर सणसणीत आरोप

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याचे या वर्षी जे चित्रपट प्रदर्शित झाले त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan bollywood Actor : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याचे या वर्षी जे चित्रपट प्रदर्शित झाले त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यात जानेवारीमध्ये आलेला पठाण आणि सप्टेंबरमध्ये आलेल्या जवाननं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. सध्या किंग खान एका प्रसिद्ध गायकाच्या आरोपामुळे चर्चेत आला आहे.

किंग खानचा डिसेंबरमध्ये डंकी नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या गॉसिप आणि स्टाईलमुळे चर्चेत राहिला आहे. भारतातील सर्वाधिक चाहतावर्ग असणारा अभिनेता म्हणून शाहरुखचे नाव घ्यावे लागेल. केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये त्याचे चाहते आहेत.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

आता प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांनी किंग खानवर गंभीर आरोप केले असून त्याची चर्चा होत आहे. आजतकनं यासंबंधी अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे. ज्यांनी येस बॉसमधील मैं कोई ऐसा गीत गाऊ, चलते चलते मधील प्यार हमको भी है, प्यार तुमको भी है, ही गाणी ऐकली असतील त्यांना अभिजित यांचे नाव चटकन डोळ्यासमोर येईल. शाहरुखच्या बहुतांशी चित्रपटातील गाणी अभिजित यांनी गायली आहेत.

एका मुलाखतीमध्ये अभिजित यांनी शाहरुखच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही खुलासे केले आहेत. ते ऐकल्यावर शाहरुखच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. शाहरुख हा खूपच व्यावसायिक वृत्तीचा व्यक्ती असून तो लोकांचा वापर करुन घेतो. असे अभिजित यांनी म्हटले आहे. शाहरुखनं त्याच्या आतापर्यतच्या बॉलीवूड करिअरमध्ये शेकडो कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र अभिजित भट्टाचार्य यांच्याबरोबर काम करताना काही वाद झाले आहेत, असे दिसून आले आहे.

अभिजित यांनी शाहरुखच्या अंजाम, येस बॉस, मैं हू ना, बिल्लू सारख्या चित्रपटांतील गाण्यांसाठी आवाज दिला आहे. अभिजित यांनी त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, शाहरुख हा सेल्फ मेड मॅन आहे. यात वाद नाही. त्याच्याकडे खूप आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्टही आहे. या दोन्ही गोष्टींकडे आमच्याकडे आहेत. दोघांमध्ये इगो नाही पण सेल्फ रिस्पेक्ट आहे.

आम्ही बऱ्याचदा आमच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण तो काही मिटला नाही. त्याचा काही फायदाही झाला नाही. शाहरुख हा लोकांचा वापर करतो आणि त्याच्या यशस्वी होण्याच्या मार्गात कुणाला येऊ देत नाही. असे विधान अभिजित यांनी शाहरुखविषयी केले आहे. यापूर्वी देखील त्यांनी २०१६ मध्ये शाहरुख, सलमानसहित करण जोहरला सुनावले होते. त्या विधानाची चर्चा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT