Shah Rukh Khan Birthday esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Birthday : वाढदिवसाच्या निमित्तानं शाहरुखनं चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट!

यंदाचे वर्ष शाहरुखसाठी प्रचंड लाभदायी ठरताना दिसत आहे. त्याचा यावर्षी पहिल्यांदा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं हजार कोटींची कमाई केली होती

युगंधर ताजणे

Shah Rukh Khan Birthday : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा केवळ भारतातच नाहीतर जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. शाहरुखचा जेव्हा एखादा नवा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा दुबईत देखील त्याचे जोरदार स्वागत केले जाते. किंग खानचा आज जन्मदिवस असून त्यानिमित्तानं त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदाचे वर्ष शाहरुखसाठी प्रचंड लाभदायी ठरताना दिसत आहे. त्याचा यावर्षी पहिल्यांदा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं हजार कोटींची कमाई केली होती. परदेशातही हा चित्रपट तुफान चालला होता. यानंतर आलेल्या जवाननं देखील सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन आपल्या नावावर वेगळा विक्रम केला होता. आता त्याच्या डंकी या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

सोशल मीडियावर शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देत त्याच्यासंबंधीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. शाहरुखनं देखील चाहत्यांना जन्मदिनाच्या निमित्तानं आगळं वेगळं गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाहरुखचा बहुचर्चित आणि लोकप्रिय असा जवान नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा सुरु होती.

थिएटरमध्ये जवान मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला होता. त्यानंतर तो ओटीटीवर कधी येणार याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. आता तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. शाहरुखच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जवान ओटीटीवर येणार अशी माहिती यापूर्वी सुत्रांनी दिली होती. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जवाननं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास त्याचा डंकी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi : राहुल गांधी छत्रसाल स्टेडियममध्ये, कार्यकर्ते आक्रमक

IND vs ZIM: झिम्बाब्वेत वैभव सूर्यवंशीची खरी परीक्षा! पहिला सामना कधी, किती वाजता; संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

राहुल गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव! ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून मारहाण? काँग्रेसची अधिकृत पोस्ट

Manchar News : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुणे जिल्ह्याची दुहेरी बाजी; काळवाडी प्रथम, कडाचीवाडीला पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT