Shah Rukh Khans Dunki Public Review  Esakal
मनोरंजन

Shah Rukh Khans Dunki Public Review: किंग खानच्या सिनेमात विकीचा वाजतोय डंका! डंकी पाहून चाहत्यांची झाली निराशा?

बॉलिवूडचे बहुप्रतिभावान दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Vaishali Patil

Shah Rukh Khans Dunki Public Review: यंदाचे वर्ष शाहरुख खानसाठी खुपच खास होते. एकीकडे त्याची मुलगी सुहाना खानने द आर्चीच मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तर दुसरीकडे त्याचे दोन सिनेमे पठाण आणि जवान बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले.

दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तब्बल हजार कोटींची कमाई केली आहे. आता सर्व चाहत्यांना शाहरुख खानचा आगामी डंकी या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा होती. डंकीच्या माध्यमातून एक वेगळी स्टोरी प्रेक्षकांना पहायला मिळणार अशी अपेक्षा केली जात होती.

कारण बॉलिवूडचे बहुप्रतिभावान दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता डंकी रिलिज झाला आहे आणि नेटकऱ्यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे. काहींना हा सिनेमा कमाल वाटला आहे तर अनेकांची हा सिनेमा पाहिल्यानंतर निराशा झाली आहे. प्रेक्षकांना शाहरुख खान पेक्षा जास्त तर विकी कौशलची चर्चा होत आहे. विकीच्या अभिनयाचे खुपच कौतुक होत आहे.

शाहरुख खान-तापसी पन्नूचा 'डंकी' चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांना जेव्हा मिडियाने विचारले की चित्रपट कसा होता त्यावेळी अनेकांनी या चित्रपटाला निराशाजनक म्हटलं आहे.

'डंकी'ची लांबी एकूण २ तास ४१ मिनिटांची आहे. तर डंकीचा फर्स्ट हाफ सिनेमा चांगला झालाय तो फक्त विकी कौशलमुळे असं अनेकांनी सांगितले आहे. विकीच्या जबरदस्त अभिनयामुळे मध्यंतरापर्यंत सिनेमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

एका चाहत्याने सांगितलं की तो पूर्णपणे निराश झाला आहे, कारण त्याला राजू हिरानीकडून खूप अपेक्षा होत्या, पण तसं झालं नाही. मुद्दाम लोकांना रडवण्याचा एक प्रयत्न केला आणि शाहरुखने खूप निराश केली असल्याचे त्याने सांगितले.

तर दुसऱ्याने सांगितले की, "चित्रपटात विकी कौशलचे काम चांगले आहे. राजकुमार हिरानी यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र मी निराश झालो आहे."

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटात शाहरुख खान अभिनेत्री तापसी पन्नूसोबत रोमान्स करताना दिसत आहे. विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हिरानी यांनी शाहरुखच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत या चित्रपटाची सहनिर्मितीही केली आहे. या चित्रपटाची कथा हिराणी, अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी एकत्र लिहिली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'डंकी' भारतात जवळपास 45 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

Nainital Travel: ऑफ सीजन बनला सुपरहिट! पावसाळ्यात नैनीतालमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी, स्थानिकांची कोट्यवधींची उलाढाल

Team India Selection:भारतीय संघात श्रेयवादासाठी चढाओढ! गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यावरही 'ती' दोघं ठरतायेत वरचढ; Inside News

SCROLL FOR NEXT