Shaheer Sheikh's father Passed Away 
मनोरंजन

'पवित्र रिश्ता २' फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; कोरोनाशी झुंज अपयशी

शहनवाज शेख यांना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

स्वाती वेमूल

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता शाहीर शेखचे (Shaheer Sheikh) वडील शहनवाज शेख यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर बुधवारी शहनवाज यांची प्राणज्योत मालवली. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. एक दिवसापूर्वीच वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती शाहीरने ट्विट करत दिली होती. 'माझे बाबा व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाशी ते झुंज देत आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा', असं ट्विट त्याने केलं होतं. (Covid 19)

'बिग बॉस' फेम अली गोणी, हिना खान यांसारख्या कलाकारांनी ट्विट करत सहवेदना व्यक्त केल्या. शाहीरने नोव्हेंबर २०२० मध्ये रुचिका कपूरशी लग्न केलं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं.

शाहीर शेख सध्या 'पवित्र रिश्ता २' या मालिकेत भूमिका साकारत आहे. शाहीर आणि अंकिता लोखंडेच्या या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. २८ जानेवारीपासून ही मालिका झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या ४३,६९७ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ४६,५९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६४,७०८ इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट 2026 फेरपरीक्षेसाठी मिळणार अतिरिक्त वेळ, अ‍ॅडमिट कार्ड १४ जूनपर्यंत; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

जागतिक तेल बाजारात खळबळ, होर्मुझ जवळ नांगरुन ठेवलेलं जहाज पळवलं, कुणी आणि कुठे नेलं?

अर्शदीप सिंग पुन्हा वादात अडकला! तिलक वर्मावर वर्णद्वेषी टिप्पणी, नेटकरी खवळले

Ahilyanagar Storm News: अवकाळीने घेतला तिघांचा बळी; अहिल्यानगर जिल्ह्यात २५ घरांचे नुकसान, चार तालुक्यांना तडाखा..

NEET 2026 Paper Leak : एकाच कुटुंबातील ५ जणांचं NEET परीक्षेत यश, पोस्टनंतर चक्रं फिरली; कुटुंबातल्या तिघांना अटक

SCROLL FOR NEXT