Sharukh Khan And Abram Khan  esakal
मनोरंजन

शाहरुखचा मुलासह दिसला वेगळा अंदाज, ईदच्या दिल्या शुभेच्छा !

शाहरुखचा मुलासह दिसला वेगळा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बाॅलीवूडचा किंग ऑफ रोमान्स म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता शाहरुख खानने पुन्हा एकदा चाहत्यांचे मने जिंकली. त्याने मुलासह ईदनिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. शाहरुख खान (Sharukh Khan) ईदच्या विशेष प्रसंगी छोटा मुलगा अब्रम खानसह 'मन्नत' या आपल्या घराच्या बालकनीत येऊन चाहत्यांना अभिवादन केले. दोघाही बापलेकाचे छायाचित्रे आणि व्हिडिओज् मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. (Shahrukh Khan And Abram Khan Pictures On Eid Goes Viral)

शाहरुख अब्रमचा लूक

ईद (Eid) आणि वाढदिवसाच्या दिवशी शाहरुख खानच्या मन्नत या घराबाहेर चाहते मोठ्या संख्येने जमा होतात. येथे किंग खान आपल्या चाहत्यांना अभिवादन करुन शुभेच्छा देतो व घेतोही. यावेळीही शाहरुख खान ईदनिमित्त चाहत्यांसमोर आला. याप्रसंगी त्याच्याबरोबर अब्रमही होता. छायाचित्रांमध्ये वडील शाहरुखप्रमाणे अभिवादन करताना अब्रम दिसत आहे. सोशल मीडियावर शाहरुख-अब्रमचे छायाचित्रे व व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

बऱ्याच काळानंतर चित्रपटात दिसणार

शाहरुख खान हा 'पठाण' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. पठाण जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात जाॅन अब्राहम आणि दीपिका पदुकोणही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT