श्रीलंकेतील संकटावर स्वरा भास्कर स्पष्टच बोलली; म्हणाली, न मिट सकेंगे एक दिन!

अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणते, न मिट सकेंगे एक दिन!
Swara Bhaskar
Swara Bhaskaresakal

श्रीलंकेत प्रदर्शन करणारे नागरिक आता हिंसेवर उतरले आहेत. श्रीलंकन राष्ट्रपतीच्या विरोधात सतत 'गोता गो गामा' आणि 'गोता गो होम', अशा घोषणा दिल्या जात आहेत. जनतेने राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवून तोडफोड केली. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी घरात घुसून आग लावण्यात आली. सोशल मीडियावर निदर्शने करणाऱ्यांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावर अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Swara Bhaskar
'द घोस्ट'मधील नागार्जुनच्या भूमिकेची चर्चा, केवळ ४९ सेकंदात ८ जणांची हत्या

स्वरा भास्करने श्रीलंकेत (Sri Lanka) राष्ट्रपती भवनावर नियंत्रण मिळविल्यानंतर नागरिकांनी किचनही ताब्यात घेऊन व्हिडिओ शेअर केला आहे. त्याबरोबरच स्वरा भास्करने दोन ओळीत एक कविता लिहिली आहे. ती लिहिते, बुरी है आग पेट की, बुरी है दिल के दाग ये, न मिट सकेंगे एक दिन, बनेंगे इंकलाब ये ! (जनवादी गीत : तू जिन्दा है)

Swara Bhaskar
...जबाबदारी नाहीच, कुणाल कामराची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

स्वरा भास्करच्या या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इम्मी नावाची यूजर म्हणते, अन्न आणि पोटाचा प्रश्न आहे. आमच्या समोर जे येणार आहे, त्याचीही स्थिती अशीच होणार आहे. सिंहासन खाली करा जनता येत आहे. एक यूजरने लिहिले की समजू शकते की पोटासाठी काय-काय नाही करावे लागत. स्वरालाही हेच हवे आहे, अराजकता. एक भारतीय राजकारणीही आहे ज्याला असेच हवे आहे, असे कश्यप नावाचा यूजर म्हणतो. त्रस्त जनता काहीही करु शकते. नवीन श्रीलंकेचा वाद धुसर सिद्ध होऊ शकतो. हे तर होणारच होते. शेवटी चीनचा प्रोपेगेंडा यशस्वी झाला, असे संघर्ष नावाच्या यूजरने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com