Shivsena Uddhav Thackery Prasad Khandekar esakal
मनोरंजन

Shivsena 57 Anniversary : प्रसाद खांडेकर शिवसेनेत; म्हणाला, माझ्या बाबानंतर आज मी...

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे भाषण केले त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shivsena Uddhav Thackery Prasad Khandekar : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे भाषण केले त्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. यावेळी टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी मालिका महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांनी सादरीकरण केले. त्यात सर्वांच्या वतीनं कलाकार प्रसाद खांडेकरनं व्यक्त केलेलं मनोगत चर्चेचा विषय आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हास्यजत्रेच्या टीमचे षण्मुखानंद हॉलमध्ये सादरीकरण केले.त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. हास्यजत्रेच्या टीमनं शिवसैनिकांचे मनोरंजन केले. उद्धव ठाकरेंनी हाच धागा पकडून म्हटले की, शिवसैनिकांना हसविण्यासाठी काही काळ हास्यजत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून दोन घटका करमणूक व्हावी यासाठी मार्मिक नावाच्या साप्ताहिकाची निर्मिती केली होती. त्यातून त्यांनी प्रबोधनही केले होते. त्याला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर शिवसैनिकांचे दोन घटका मनोरंजन व्हावे यासाठी हास्यजत्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

माझे बाबा बोरिवलीत शिवसेनेचे शाखा प्रमुख होते. बाबांचे ९९ मध्ये निधन झाले. मी त्यावेळी १४ वर्षांचा होतो. तेव्हाही वर्धापन दिनी बाबा मला घेऊन यायचे. मी त्या सभेमध्ये सहभागी झालो होतो. आज मला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्यासमोर सहभागी होण्याची संधी मिळते आहे. याचा मला खूप आनंद होतो आहे. ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. अशी भावना प्रसाद खांडेकरनं व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणात हास्यजत्रेचे दाखले....

आपल्या भाषणात ठाकरे यांनी टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील पात्रांचे दाखले दिले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी काल परवा हास्यजत्रेचा प्रयोग सादर केला. यावेळी ठाकरे यांनी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जो उल्लेख केला ते मोबाईलवरुन श्रोत्यांना ऐकवले. तसेच आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठविण्याची आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT