Sridevi Prasanna Teaser: Esakal
मनोरंजन

Sridevi Prasanna Teaser: 'श्रीदेवी' करेल का 'प्रसन्न'? सई-सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी!धमाकेदार टिझर पहाच

टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Vaishali Patil

Sridevi Prasanna Teaser: मनोरंजन विश्वात सध्या मराठी सिनेमांची चांगलीच हवा आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू पसरवणार असं चित्र आहे. त्यात माधूरीचा 'पंचक' आणि नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकरचा 'ओले आले' या चित्रपटाची चर्चा होत असतानाच आता आणखी एका मराठी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो म्हणजे "श्रीदेवी प्रसन्न"

टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची खुप उत्सुकता होती.

"श्रीदेवी प्रसन्न" चित्रपटात प्रेक्षकांना सई ताम्हणकरसोबत सिद्धार्थ चांदेकरची जोडी जमणार आहे. आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहेत. सई-सिद्धार्थची केमिस्ट्री आणि संवादांची जुगलबंदी आपल्याला टिझरमध्येच दिसत आहे. लग्न का करावं, कुणाशी करावं असे अनेक प्रश्न हा टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पडणार आहे.

या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ यांच्यासोबतच सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार दिसणार आहे.

विशाल विमल मोढवे दिग्दर्शित 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमाचं नावच फिल्मी नाही तर हा सिनेमा देखील प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन करेल आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागला नाही शोध

SCROLL FOR NEXT