Ira-Nupur Wedding 'जर का कुणी चुकूनही...', आमिरच्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी पाहुण्यांसाठी खास नियमावली?

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रिना दत्त यांची मुलगी आय़राचं लग्न हा सध्याच्या घडीला मनोरंजन विश्वातील सर्वात ट्रेंडिंगचा विषय आहे.
Ira Khan-Nupur Shikhare Wedding
Ira Khan-Nupur Shikhare Wedding

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रिना दत्त यांची मुलगी आय़राचं लग्न हा सध्याच्या घडीला मनोरंजन विश्वातील सर्वात ट्रेंडिंगचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून आयराच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर ती आज विवाहबंधनात अडकणार आहे.

आय़रा आणि नुपूर शिखरेच्या लग्नाला जी पाहुणे मंडळी येणार आहे त्यांच्यासाठी खास नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी आयरानं एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये तिनं तिच्या सहकाऱ्यांना, मित्रांना लग्नाची जी पत्रिका पाठवली होती त्यामध्ये एक पझल होते. ते पझल सॉल्व्ह करणाऱ्यांना लग्नाला निमंत्रण होते. असे त्या व्हिडिओतून दिसून आले. Ira Khan Nupur Shikhare Court Marriage Today

आयराची आई रिना दत्ता, सावत्र आई किरण राव आणि इतर कुटूंबीय यांचे हळदीच्या वेळचे काही फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये त्यांनी केलेला पारंपरिक लूक हा चर्चेत आला होता. त्यावरुन चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुकही केले होते. आमिरनं देखील आपल्या लेकीच्या लग्नाच्या निमित्तानं एक जी मुलाखत दिली होती त्यामध्ये आपण या लग्नामध्ये खूप रडणार असल्याचे म्हटले होते.

या सगळ्यात एक गमतीशीर बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जी पाहुणे मंडळी या लग्नाला हजेरी लावणार आहे त्यांच्यासाठी खास नियमावली तयार करण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्टसनं दिलेल्या माहितीनुसार आमिरनं आयराच्या लग्नासाठी नो गिफ्ट पॉलिसी अशी अट पाहुण्यांना, मित्रांना आणि परिवारातील सदस्यांना घातली आहे. ज्याची चर्चा होताना दिसत आहे.

ज्यांना कुणाला आयराला किंवा नुपूरला आहेर द्यायचा असेल किंवा गिफ्ट द्यायचे असेल त्यांनी ते एखाद्या एनजीओला द्यावेत. असे आवाहन दोन्हीकडच्या कुटूंबीयांकडून करण्यात आले आहे. अगात्सू फाउंडेशनसाठी तुम्ही आर्थिक सहकार्य करु शकता असे सांगण्यात आले आहे.

बऱ्याच वर्षांपासून आयरा ही तिचा मित्र नुपूरला डेट करत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांचा साखरपुडा झाला. काही दिवसांपासून लग्नाचीही चर्चा रंगली होती. मीडिया रिपोर्टसनं दिलेल्या माहितीनुसार, या लग्नामध्ये ९०० जण सहभागी होणार आहेत. मुंबईतील ताजमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

८ जानेवारीला नुपूर आणि आयरा हे राजस्थानातील उदयपूर मध्ये शाही विवाह करणार आहेत. त्याला बॉलीवूडमधील विविध सेलिब्रेटी हजर राहणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर १३ जानेवारीला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शनही पार पडणार आहे.

Ira Khan-Nupur Shikhare Wedding
Ira Khan Wedding : आज आमिरच्या लेकीचं लग्न! Pre Wedding चे फोटो शेयर करत केला होणाऱ्या नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com