मनोरंजन

Siddharth Jadhav: "राज ठाकरे स्वतः उतरले अन्.." सिद्धार्थनं शेयर केला विलक्षण अनुभव

सिद्धार्थने एक व्हिडिओ शेयर करत आपल्या मनातील भावना त्याच्या चाहत्यांना सांगितल्या आहेत.

Vaishali Patil

सध्या पुण्यात नाट्य संमेलन सुरु आहे. रविवारी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे परत मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाक्यावर चांगलच ट्राफिक जमलं होतं.

यावेळी टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी राज ठाकरे या गर्दीत अडकले होते. यावेळी राज ठाकरे संतापले अन् गाडीतून उतरले आणि टोल अधिकाऱ्यांना दम दिला. यानंतर तासनतास अडकून पडलेल्या गाड्यांना वाट करून दिली.

त्यावेळी राज ठाकरेंसोबत मराठ मोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव राज ठाकरे यांच्यासोबत प्रवास करत होता. त्याने हा सगळा प्रकार स्वत: पाहिला. त्यानंतर सिद्धार्थने एक व्हिडिओ शेयर करत आपल्या मनातील भावना त्याच्या चाहत्यांना सांगितल्या आहेत.

यावेळी सिद्धार्थ म्हणला, 'नमस्कार मी सिद्धार्थ..मी राज ठाकरे यांच्यासोबत पुण्याहून मुंबईला प्रवास करत होतो. त्यांच्यासोबत आम्ही प्रवास करत होतो. खालापूर टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांना जाण्यासाठी मार्ग करून दिला पण ते टोल नाक्यावर जाऊन स्वतः सर्व वाहनं सोडली. 5 किमी ट्रॅफिक होती, लोकांना त्रास होत होता त्यात अॅम्ब्युलन्स सुद्धा अडकली होती.

यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः उतरून सर्व ट्रॅफिक क्लिअर केली तसेच पुढील सर्व टोल नाक्यावर सुद्धा राज ठाकरे उतरले आणि ट्रॅफिक क्लिअर केली माझ्यासाठी विलक्षण क्षण असल्याचे सांगितले होते.'

गेल्या अनेक दिवसांपासून टोल नाक्याचा प्रश्न मनसे उपस्थीत करत आहे. त्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी देखील या प्रश्नवर भाष्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा राज ठाकरे यांनी टोल नाक्याच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. या प्रकरणावरुन मनसे पुन्हा टोल विरोधात आंदोलन करणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT