Merry Christmas Cast Fees: विजयपेक्षा कतरिनानं घेतलं जास्त मानधन! 'मेरी ख्रिसमस'साठी कोणत्या स्टार्सनी किती फी घेतली?

आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटासाठी स्टार्सने किती फी घेतली यावर नजर टाकूया.
Merry Christmas Cast Fees:
Merry Christmas Cast Fees:Esakal

Merry Christmas Cast Fees: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि टॉलिवूड अभिनेता विजय सेतुपती हे सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत. कतरिना आणि विजय आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या हे दोन्ही स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

या चित्रपटातून पहिल्यांदाच कतरिना आणि विजयची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा एक हा क्राईम-थ्रिलर चित्रपट आहे. हा सिनेमा 12 जानेवारीला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. आता या चित्रपटासाठी कोणत्या कलाकाराने किती फी घेतली याबद्दल चर्चा सुरु आहे तर आता या चित्रपटासाठी स्टार्सने किती फी घेतली यावर नजर टाकूया.

कतरिना कैफ

'मेरी ख्रिसमस'मध्ये कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात कतरिना मारियाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिची विजयसोबत जोडी जमणार आहे. ती विजयसोबत रोमान्स करतानाही दिसली आहे. कतरिनाने या चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेतले आहे. तिने या चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतले आहेत.

विजय सेतुपती

'मेरी ख्रिसमस' या क्राइम थ्रिलर चित्रपटात विजय सेतुपती वेगळ्या धाटणीची भूमिका करताना दिसणार आहे. आता विजय या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारतोय याबाबत माहिती समोर आलेली नाही. तर वृत्तानुसार, या चित्रपटासाठी विजयने 8-10 कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा आहेत. मिडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी पहिले सैफ अली खानशी संपर्क साधला होता. मात्र त्यानंतर या जागी विजयला कास्ट केले.

संजय कपूर

राघवनचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट हिंदी आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या हिंदी भागात संजय कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटासाठी संजय कपूरने खुपच कमी मानधन घेतले आहे. संजयने या चित्रपटासाठी एक कोटी रुपये फि घेतली आहे.

राधिका आपटे

तर या 'मेरी ख्रिसमस'मध्ये राधिका आपटेचा कॅमिओ प्रेक्षकांना दिसणार आहे. राधिका म्हणते की ती श्रीराम राघवनच्या चित्रपटांचा नेहमीच भाग असते. यापुर्वी ती राधिका राघवनच्या 2015 मध्ये आलेल्या 'बदलापूर' आणि 2018 मध्ये 'अंधाधुंध' या सिनेमातही दिसली आहे. राधिकाने या चित्रपटात कॅमिओसाठी 2 कोटी रुपये घेतले आहेत

चित्रपटात हिंदीमध्ये विनय पाठक, प्रतिमा काझमी आणि टिनू आनंद यांच्याही भूमिका आहेत, तर तमिळ व्हर्जनमध्ये राधिका सरथकुमार, गायत्री, षणमुगराजन, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स सारखे कलाकार दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com