Asha Bhosle, Malaika Arora Google
मनोरंजन

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना डान्स न शिकल्याची खंत!

वयाच्या ८८व्या वर्षी 'गोमू संगतीनं' गाण्यावर धरला ठेका!.पहा व्हिडीओ

प्रणाली मोरे

वय वर्ष ८८ पण त्यांच्यातला उत्साह मात्र भल्याभल्यांना लाजवेल असा. हो,आम्ही बोलत आहोत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याविषयी. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांसारखी मोठी बहिण लाभली असताना आशा भोसलेंनीही आपलं स्वतंत्र प्रस्थ निर्माण केलं. आपल्या गळ्यातनं निघणा-या जादूई आवाजाला त्यांनी केवळ विशिष्ट सुरात बांधून न ठेवता सगळ्या पद्धतीची गाणी गायली. देवाच्या देवळात वाजणारं त्यांच्या आवाजातलं गाणं ऐकल्यावर जसा भक्तीचा आर्त सूर दाटून येतो तितकंच त्यांनी गायलेलं एखाद डिस्को सॉंग बसल्या जागेवर पाय थिरकवायला भाग पाडतं. मात्र सत्तरहून अधिक वर्ष फक्त गाण्याला देव मानून पुजणा-या आशा भोसलेंनी लहानपणी डान्स न शिकल्याची खंत नुकतीच व्यक्त केलीय. सोनी टि.व्ही वरील 'इंडियाज बेस्ट डान्सर' सिझन२ मध्ये त्यांनी पाहुण्या परिक्षक म्हणून उपस्थिती लावली होती.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले आतापर्यंत अनेक गाण्याशी संबंधित शो मध्ये पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. पण एखाद्या डान्सशी संबंधित कार्यक्रमात आपण पहिल्यांदाच आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. इथे गेल्यावर आशा भोसलेंनी तिथे उपस्थित जजेससोबत डान्स तर केलाच पण एका प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या आजीबाईंसोबतही 'गोमू संगतीनं' गाण्यावर डान्स केला. त्यांनी मलायका अरोरा सोबत ह्रतिक रोशनच्या 'इक पल का जीना' या गाण्यावर धरलेल्या ठेक्यानं तर उपस्थितांना स्तब्ध करून ठेवलं. आशाजींनी 'एक मै और एक तू' गाण्यावर टेरेन्ससोबत केलेला डान्सही उपस्थितांची मनं जिंकून गेला.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या आपल्या कारकिर्दींची ७५ वर्ष यंदा पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने 'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोमध्ये त्यांनी गायलेल्या गाण्यांवर स्पर्धकांनी डान्स केले. आशा भोसले यांनी जवळजवळ १२०० हून अधिक गाणी गायली आहेत. आजही त्या गाण्याशी संबंधित कार्यक्रमातनं उपस्थित राहून आपलं गाण्यावरचं प्रेम व्यक्त करीत असतात. ज्येष्ठ संगीतकार आर.डी.बर्मन यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. या दोघांनी मिळून केलेल्या गाण्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'इंडियाज बेस्ट डान्सर' सिझन २ मधला आशा भोसले स्पेशल एपिसोड प्रेक्षकांसाठी मनसोक्त मनोरंजन करणारा ठरणार एवढं नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Fine: एसटी बस चुकीच्या ठिकाणी थांबवली तर कर्मचाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करणार! MSRTC चा मोठा निर्णय, काय कारवाई होणार?

१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय सांगितलं?

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Mumbai Local: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

SCROLL FOR NEXT