आता महिलांसाठी काम करायचंय;तापसी पन्नूची नवी इनिंग

'थप्पड' फेम अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल.....
Taapsee Pannu
Taapsee PannuGoogle

'पिंक','थप्पड','बदला','शबाना','हसिन दिलरुबा','रशमी रॉकेट' असे हटक्या पद्धतीचे सिनेमे करणा-या तापसी पन्नूनं(Taapsee Pannu) आपला असा एक चाहतावर्ग तयार केलाय. अर्थात यासाठी तिला वेगळं असं काही करावं लागलं नाही तर ते काम तिच्या अभिनयानं सहज करून दाखवलं. तिने स्वतःला विशिष्ट भुमिकांमध्ये बांधून ठेवलं नाही,तर नेहमीच ती स्वत:चं काम चांगल व्हावं म्हणून सिनेमाच्या माध्यमातनं प्रयोगशील राहिली. अशी उत्तम अभिनेत्री असलेली तापसी आपले विचार थेट बोलून दाखवण्यात कधी मागे राहत नाही. आता इथे तिची बरोबरी कंगना सोबत मात्र केली जाऊ शकत नाही. कारण कंगना बोलते ते वाह्यात असतं आणि तापसीचे विचार हे समोरच्याला विचार करायला लावण्यासारखे असतात.

Taapsee Pannu
''नाक चांगले नाही म्हणून मला रीजेक्ट केलं होतं''

तापसी जेव्हा बॉलीवूडमध्ये आली तेव्हा तिची बरोबरी कंगनासोबत केली जाऊ लागली. म्हणजे तोपर्यंत कंगना सोशल मीडियावर फार टीव-टीव करत नव्हती म्हणून ती वादग्रस्त बनली नव्हती. तेव्हा तापसीनंही ते सगळं चांगल्या अर्थाने घेतलं होतं. पण पुढे कंगला उधळलेल्या उद्दाम घोडयासारखी बेफाम,बेताल वक्तव्य करीत सुटली आणि तिथेच ब-याचदा तापसी आणि कंगनात वादाची ठिणगी पेटली. जेव्हा कंगनानं तापसीला 'गरिबांची कंगना' म्हणून संबोधलं तेव्हा आणि त्यापुढे अनेकदा कंगनाच्या बाष्कळ विधानांवर तापसीनंही कंगनाला धारेवर धरत पलटवार केला. कंगनामुळेच ब-याचदा वादाच्या मुद्दयांवर चर्चेत येणारी तापसी आता मात्र तिनं उचललेल्या एका चांगल्या पावलामुळे चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut,Taapsee Pannu
Kangana Ranaut,Taapsee PannuGoogle

सोशल मीडियावर तापसीनं नुकतचं तिच्या एका नवीन उपक्रमाची माहिती दिली. तापसी आता 'AIQA' या स्त्रियांच्या मासिक पाळीवर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातनं कार्यरत असणा-या ब्रॅंडसोबत जोडली गेली आहे. या ब्रॅंडच्या साथीनं तिनं 'पिरीयड पल' हे अॅप लॉंच केलं आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीविषयीच्या तक्रारी,आजार,आणि त्त्या काळात घ्यावयाची स्वच्छता याविषयीची माहिती आणि त्यावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन,मासिक पाळी संबंधित प्रॉडक्ट्स,आणि स्वतः तापसीने शेअर केलेले अनुभव असं बरंच काही या अॅपच्या माध्यमातून उपयुक्त असं भेटीस येणार आहे.

Taapsee Pannu
''शाहिदच काय त्याच्या साध्या फोनवरही माझंच राज्य,कोई शक!''

तापसी यासंदर्भात म्हणाली,''मला स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भात समाजात असलेल्या गैरसमजूती आहेत त्या दूर करायच्या आहेत. मला समाजाच्या मानसिकतेत बदल घडवायचा आहे. आणि मला आशा आहे महिलावर्ग मला या कामात सहकार्य करतील. या अ्ॅपच्या माध्यमातनं गावोगावी पोहोचायचंय,तिथे मासिक पाळी संदर्भात जनजागृती करणं अधिक गरजेचं आहे आणि ते आम्ही या अॅपच्या माध्यामातून करू''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com