Sonam Kapoor reveal many things about her new born baby boy, her maternity photo shoot caption Viral... Instagram
मनोरंजन

लंडन की भारत! सोनम कपूर कुठे घालणार मुलाला शाळेत, मनातलं स्पष्टच बोलली...

प्रेग्नेंसी दरम्यान सोनम कपूरनं एक फोटोशूट करत त्याला कॅप्शन देताना मुलाच्या पुढील पालनपोषणाविषयी अनेक खुलासे केले होते,जे आता चर्चेत आले आहेत.

प्रणाली मोरे

Sonam Kapoor: सोनम कपूरला नुकताच पूत्ररत्नाचा(Baby Boy) लाभ झाला आहे. यामुळे संपूर्ण कपूर आणि आहूजा कुटुंब भलतंच खुशीत आहे. सोनमचे चाहते देखील सोनम आणि आनंद आहूजावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत. बॉलीवूडमधूनही सोनमला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यानच सोनमनं आई बनल्यानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया देखील चर्चेत आली होती. सोनमनं काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केलं होतं,ज्यामध्ये ती नवव्या महिन्यातलं बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. त्या फोटोशूटच्या निमित्तानं मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या मुलाचं पुढचं पालनपोषण करताना तिनं काय योजलं आहे याविषयी देखील तिनं मनातल्या सगळ्या गोष्टी दिलखुलासपणे सांगितल्या.(Sonam Kapoor reveal many things about her new born baby boy, her maternity photo shoot caption Viral...)

सोनम कपूरने प्रेगनन्सी दरम्यान केलेलं एक लेटेस्ट फोटोशूट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे, ''तिनं अजून हा निर्णय नाही घेतला की ती आपल्या मुलाचं शिक्षण कुठे करणार आहे, लंडन की भारत? यानंतर अभिनेत्रीनं भारताविषयीच्या आपल्या प्रेमाला जाहीर करत लिहिलं आहे की,मला माझं भारत माझ्या घराइतकंच जवळचं आहे आणि मी पूर्णपणे मुंबईची मुलगी आहे''.

आपल्या डिलीव्हरीच्या काही दिवस आधीच सोनमने एका मुलाखतीत आपल्या मुलाच्या पालनपोषणाविषयी बातचीत केली होती. सोबतच,तिनं ९ महिन्यांचा प्रेगनन्सीचा अनुभव देखील शेअर केला होता. आई बनल्यानंतर व्हायरल झालेल्या सोनम कपूरच्या दुसऱ्या पोस्टमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सोनममं एका अनबटन शर्टमध्ये देखील मॅगझीनसाठी फोटोशूट केलं होतं. ज्या फोटोना कॅप्शन देताना अभिनेत्रीनं लिहिलं होतं की,''आता गोष्टींचा प्राधान्यक्रम बदलेल आणि मला वाटतं माझं बाळ आता माझ्याकडे लवकरच येईल. बाळाला या जगात आणण्याचा निर्णय आपण घेतो, बाळ नाही. आपण खूपच स्वार्थी आहोत.'' तिची ही पोस्ट तिला बाळ झाल्यानंतर आता खूपच चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT