Soundarya Reacts to Aishwaryaa & Dhanush's divorce  
मनोरंजन

धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटावर बहीण सौंदर्याची प्रतिक्रिया

१८ वर्षांच्या संसारानंतर अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

स्वाती वेमूल

१८ वर्षांच्या संसारानंतर अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa) यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. १७ जानेवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या दोघांनी विभक्त होत असल्याचं चाहत्यांना सांगितलं. धनुष आणि ऐश्वर्याच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर काही वेळाने सौंदर्या रजनीकांतने अप्रत्यक्षपणे या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली. ऐश्वर्या आणि सौंदर्या या रजनीकांत यांच्या मुली आहेत. सौंदर्याने तिच्या ट्विटर अकाऊंटचा डिस्प्ले पिक्चर (DP) बदलत त्यावर रजनीकांत यांच्यासोबतचा ऐश्वर्या आणि तिचा लहानपणीचा फोटो ठेवला. #NewProfilePic असा हॅशटॅगसुद्धा तिने या फोटोला दिला. या नव्या फोटोमध्ये रजनीकांत आपल्या दोन्ही मुलीसोबत दिसत आहेत.(Soundarya Reacts to Aishwaryaa & Dhanush's divorce)

धनुषची पोस्ट -

''मैत्री, जोडीदार, एकमेकांचे हितचिंतक आणि पालक म्हणून १८ वर्षे पूर्ण केली. अनेक चढउतारांच्या या प्रवासात आज आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथून आम्हाला वेगवेगळे मार्ग निवडायचे आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून एकमेकांना समजून घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. आमच्या या निर्णयाचा सन्मान करा आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आवश्यक तेवढा खासगी वेळ द्या,'' अशी पोस्ट धनुषने लिहिली आहे.

ऐश्वर्यानेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली

'कॅप्शनची गरज नाही, फक्त तुमच्या प्रेमाची आणि समजूतदारपणाची गरज आहे,' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ऐश्वर्या आणि धनुषचे लग्न १८ नोव्हेंबर २००४ रोजी झाले होते. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुले आहेत. ऐश्वर्या ही दिग्दर्शिका आणि पार्श्वगायिका म्हणूनसुद्धा काम करते. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील हा आणखी एक धक्कादायक घटस्फोट आहे. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी घटस्फोट जाहीर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT