Gautami Patil news 
मनोरंजन

Gautami Patil : गावात गौतमीचा शो! पठ्ठ्यानं मागितली दोन दिवसांची रजा, ST कर्मचाऱ्याचा अर्ज व्हायरल

Sandip Kapde

Gautami Patil : सध्या महाराष्ट्रात एकच नाव गाजत आहेत. ते म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तौबा गर्दी असते. लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत गौतमी पाटीलचे फॅन आहेत. महाराष्ट्रभर गौतमी पाटीलचे कार्यक्रमत होत आहेत. गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे.

आपल्या नृत्यांनी गौतमीने अनेकांना वेड लावले आहे. गौतमी पाटील मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. गौतमी गाण्यांवर बेभान होऊन डान्स करते. त्यामुळे तरुणांमध्ये तिची मोठी क्रेझ आहे. तिचे नृत्य पाहण्यासाठी चाहते आतुरले असतात.

दरम्यान पुन्हा एकदा गौतमीचे नाव चर्चेत आले ते एका एटी कर्मचाऱ्यामुळे. गौतमी फॅन असलेल्या ST कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याने चक्क गौतमीला पाहण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे.

आपल्या नृत्यातून लोकांच्या मनावर अधिराज्या गाजवणाऱ्या गौतमीला अनेक कार्यक्रमात डान्स करण्यासाठी बोलवलं जातं,आणि त्यासाठी तिला मानधन देखील दिलं जातं. सध्या गौतमीचा चाहता असलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा एक अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

एसटी कर्मचाऱ्याने रजेसाठी केलेला अर्ज व्हायरल होत आहे. यामध्ये या एसटी कर्मचाऱ्याने गावात गौतमी पाटील येत असल्याने थेट दोन दिवसाच्या सुट्टीची मागणी केली आहे. "२२ मे ते २३ मे या दोन दिवशी गावात गौतमी पाटील येणार आहे, त्यामुळे दोन दिवसांची रजा मिळावी," असा उल्लेख अर्जामध्ये करण्यात आला आहे. या अर्जाची आम्ही पृष्टी करत नाही. (Gautami Patil News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT