Asit Modi:'शो मधुन काढलं म्हणुन', 'रोशन सोढी'नं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर असित मोदींची प्रतिक्रिया

Asit Kumarr Modi On Sexual Harassment Allegations:
Asit Kumarr Modi On Sexual Harassment Allegations: Esakal

Asit Kumarr Modi On Sexual Harassment Allegations: तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने शोच्या निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

जेनिफरने प्रोजेक्ट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि मेकर्सवर लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणावर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Asit Kumarr Modi On Sexual Harassment Allegations:
'Taarak Mehta..' मालिकेच्या निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप, अभिनेत्री म्हणाली,'७ मार्च रोजी सेटवर..'

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी यांनी जेनिफर मिस्त्री बन्सीवालचे आरोप सगळे आरोप खोटे आहेत असं म्हणतं ते फेटाळून लावले आहेत.

जेनिफर त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इतकच नाही तर जेनिफरने शो सोडलाच नाही पण तिला शोमधून बाहेर काढण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

Asit Kumarr Modi On Sexual Harassment Allegations:
The Kerala Story: निवडणुकीच्या तोंडावरच धर्मांतरावर चित्रपट का? शत्रुघ्न सिन्हांचा सवाल

या प्रकरणावर ई टाइम्सशी बोलताना  असित मोदी मोदी म्हणाले की, हे सगळे आरोप बिनबूडाचे आणि निव्वळ निराधार असल्याचं त्यांनी सांगतिलं आहे.

यात काहीच तथ्य नसल्याच त्यांनी सांगतिलं आहे. ते म्हणतात की, 'ती (जेनिफर) फक्त माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. हिच माझी खरी प्रतिक्रिया आहे. मी काहीही सबबी सांगण्याचा किंवा सत्य लपवण्याचा प्रयत्न करत नाही.

मी खऱ्या आयुष्यात कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिला शोमधून आणि आमच्या टीममधून काढून टाकलं. माझे दिग्दर्शक आणि टीमने तिला शो सोडण्यास सांगितले.

मी असचं काहीही बोलत नसून माझ्याकडे सर्वच पुरावे असल्याच असुन माझे प्रोडक्शन लवकरच सर्व पुरावे आणि कागदपत्र जमा करेल असंही त्यांनी सांगतिलं.'

Asit Kumarr Modi On Sexual Harassment Allegations:
Bigg Boss OTT: बिग बॉस ओटीटीमधुन करणचा पत्ता कट? आता 'हा' सुपरस्टार करणार होस्ट

तर दुसरीकडे भिडे मास्तर म्हणजेच मंदार चांदवडकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंदारने म्हटलं आहे की, 'जेनिफर मिस्त्रीने असं का केलं मला माहित नाही. त्याच्यात असं काय घडलं याची मला कल्पनाही नाही. हे पुरुष-अराजकीय स्थान नाही. सेटचा शो हे ताजं वातावरणं असलेलं एक आनंदी ठिकाण आहे असं नसतं तर हा शो इतक्या वर्ष चालला नसता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com