sukh mhanje nakki kay asta  
मनोरंजन

सुख म्हणजे नक्की काय असतं: जयदीप-गौरीच्या लग्नाचा शाही थाट

या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतंय ते गौरीचं मंगळसूत्र.

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेत गौरी-जयदीपच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुख येणार आहे. दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता ते पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येत समारंभ अगदी थाटामाटात पार पडतो. त्यामुळे जयदीप-गौरीचं लग्नही अगदी शाही थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, संगीत, हळद आणि वरात असा सगळा थाट लग्नात पाहायला मिळेल.

नऊवारी साडीत गौरीचं सौंदर्य आणखीनच खुलून आलंय. तर जयदीपही धोतर, फेटा अश्या पारंपरिक लूकमध्ये दिसणार आहे. माई-दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात. त्यामुळे लग्नात गौरीच्या आई-वडिलांची जबाबदारी माई-दादांनीच पार पाडली आहे. या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतंय ते गौरीचं मंगळसूत्र. जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेलं मोरपीस गौरीने लहानपणापासून जपून ठेवलं होतं. हीच निशाणी तिच्या मंगळसूत्रामध्येही जपली जाणार आहे.

प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाने रेट्रो लूकला पसंती दिली. जयदीप-गौरी काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसले. तर उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात पहायला मिळाले. शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केला होता तर मल्हारने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लूकमध्ये दिसला होता. जयदीप गौरीच्या लग्नाचा हा थाट प्रेक्षकांना सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत रात्री ९.३० वाजता पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT