बँड, बाजा अन् 'शनाया'ची वरात.. Video पाहून तुमचेही पाय थिरकतील! Rasika Sunil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rasika Sunil

बँड, बाजा अन् 'शनाया'ची वरात.. Video पाहून तुमचेही पाय थिरकतील!

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील Rasika Sunil हिचा ऑक्टोबरमध्ये विवाहसोहळा पार पडला. गोव्याच्या समुद्रकिनारी रसिकाने आदित्य बिलागीशी Aditya Bilagi लग्नगाठ बांधली. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. रसिकाने तिच्या लग्नसोहळ्याचे मोजकेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यातच तिने नुकताच वरातीच खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी निघालेल्या रसिका-आदित्यच्या या वरातीचा व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील.

रसिका एकीकडे जीपमधून येताना दिसतेय, तर दुसरीकडे आदित्य आणि नातेवाईक धमाल नाचताना दिसत आहेत. रसिका आणि आदित्य यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह सहज पहायला मिळतोय. 'तुने मारी एंट्री यार..' या गाण्याच्या बॅकग्राऊंडवर रसिकाने हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. वरातीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत.

लॉस एंजिलिसमध्ये रसिका आणि आदित्यची पहिल्यांदा भेट झाली आणि तिथेच या दोघांमध्ये प्रेमाची कळी उमलली. ज्या ठिकाणी आदित्य आणि रसिका मित्र म्हणून सर्वांत आधी फिरायला गेले होते, त्या मालिबू या ठिकाणी आदित्यने तिला प्रपोज केलं होतं. रसिकाने २०२० या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आदित्यसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला डेट करत असल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. दोन वर्षांपूर्वी ती मालिका सोडून लॉस एंजिलिस याठिकाणी पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथेच तिची आदित्यशी भेट झाली.