sumeet raghvan 
मनोरंजन

'चांगला हेतू असलेला एक तरी पक्ष मला दाखवा', सुमित राघवन भडकला

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या प्रकारावर अभिनेता सुमित राघवनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्वाती वेमूल

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या प्रकारावर अभिनेता सुमित राघवनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अॅथलेटिक्स रेस ट्रॅकवर पार्क करण्यात आला होता. याप्रकरणी ट्विट करताना सुमितने सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधला. 'महाराष्ट्र हे खेदजनक राज्य आहे', असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलंय.

सुमित राघवनचं ट्विट-

'महाराष्ट्रातील कारभार हे खेदजनक आहे. कोविड प्रोटोकॉल्स, कायदा आणि सुव्यवस्था, करदाता यांच्यासाठी इथे शून्य आदर आहे. चांगल्या हेतूचा एक तरी राजकीय पक्ष मला दाखवा. नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी निषेध मोर्चा, दहिसर टोलनाक्यावर आरक्षणासाठी मोर्चा किंवा हे..' असं ट्विट त्याने केलंय.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापिठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे हे शिवछत्रपती क्रीडा संकुल इथं दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा अॅथलेटिक्स रेस ट्रॅकवर उभ्या करण्यात आल्या होत्या. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या या अॅथलेटिक्स ट्रॅकवर खेळाडूंच्या सरावाव्यतिरिक्त इतर कोणाला पायी चालण्याचीही परवानगी नसते.

महाराष्ट्र क्रीडा विभागाकडून माफीनामा

'शरद पवारांना पायाच्या त्रासामुळे चालण्यास अडचण होऊ नये म्हणून सिमेंटेड ट्रॅक्सवर गाड्या पार्क करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने त्या गाड्या ट्रॅक्सवर पार्क करण्यात आल्या. याप्रकरणी मी माफी मागतो आणि भविष्यात पुन्हा अशी चूक घडणार नाही याचं आश्वासन देतो', असं महाराष्ट्र क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया 'एएनआय'शी बोलताना म्हणाले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून या पुढे असे प्रकार होणार नाही, यासाठी त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. ॲथलेटिक्स ट्रॅक तसेच मैदानावरही कोणत्याही प्रकारची वाहने जाणार नाही, याचीही काळजी घेण्यास केदार यांनी बजावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या सत्तांतराची Inside Story

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

SCROLL FOR NEXT