इगतपुरी रेव्ह पार्टी: अटक झालेली 'मराठी बिग बॉस' फेम हिना पांचाळ कोण आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heena panchal

इगतपुरी रेव्ह पार्टी: अटक झालेली 'मराठी बिग बॉस' फेम हिना पांचाळ कोण आहे?

नाशिकच्या इगतपुरीतील एका बंगल्यात हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीचा Igatpuri rave party पोलिसांनी पर्दाफाश केला. या रेव्ह पार्टीवर छापा टाकून ग्रामीण पोलिसांनी 'मराठी बिग बॉस' Marathi Bigg Boss फेम अभिनेत्री हिना पांचाळसह Heena Panchal २२ जणांना अटक केली. 'स्काय व्हिला' या बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीत एका इराणी महिलेसह हिना पांचाळ आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर चार सेलिब्रिटींचा समावेश होता. या कारवाईत १० पुरूष आणि १२ महिला अशा एकूण २२ जणांना अटक केली. (nashik igatpuri rave party former marathi bigg boss contestant heena panchal arrested know about her)

इगतपुरीतील बंगल्यात सेलिब्रिटींची रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी अमली पदार्थ ताब्यात घेतलं आहे.

कोण आहे हिना पांचाळ?

बहुतांश मराठी प्रेक्षकांसाठी हिना पांचाळ हे परिचयाचं नाव आहे. मराठीसोबतच हिना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. 'मराठी बिग बॉस' या रिअॅलिटी शोमुळे ती घराघरात पोहोचली. सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. 'दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मलायका' असंही तिला म्हटलं जातं. हिना काही आयटम साँग्समध्येही झळकली.

हेही वाचा: पत्नीच्या खात्यातून एक कोटी गायब, करण मेहरा अडचणीत

या रेव्ह पार्टीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पार्टीचे आयोजक कोण होते, पार्टीतील विदेशी नागरिकांनी ड्रग्ज कुठून आणले, त्याचा तपास सुरू आहे. मुंबईतील मायानगरीतील तारे तारकांसाठी विकेंड डेस्टीनेशन म्हणून इगतपुरीतील रिसॉर्ट प्रख्यात आहे. यापूर्वीही अनेकदा इगतपुरीतील पार्ट्या छाप्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

Web Title: Nashik Igatpuri Rave Party Former Marathi Bigg Boss Contestant Heena Panchal Arrested Know About

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathi bigg boss