Sunidhi Chauhan  Instagram
मनोरंजन

Indian Idol 12: ..म्हणून मी शो सोडून दिला- सुनिधी चौहान

'इंडियन आयडॉल १२'वर वाढतंय टीकांचं प्रमाण

स्वाती वेमूल

'इंडियन आयडॉल'चं Indian Idol 12 बारावं पर्व सध्या फारच चर्चेत आहे. किशोर कुमार Kishore Kumar यांचा मुलगा अमित कुमार Amit Kumar यांनी टीका केल्यापासून हा रिअॅलिटी शो चर्चेत आहे. आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान Sunidhi Chauhan हिनेसुद्धा 'इंडियन आयडॉल'मध्ये परीक्षक न होण्यामागचं कारण सांगितलं आहे. निर्मात्यांना जे अपेक्षित आहे, ते करू न शकल्याने शोमध्ये परीक्षक होण्याचं सोडून दिलं, असा खुलासा तिने केला आहे. शोमधील कलाकारांचं कौतुक करा, असं निर्मात्यांकडून सांगण्यात आल्याचं सुनिधीने यावेळी म्हटलं. 'इंडियन आयडॉल'च्या पाचव्या आणि सहाव्या पर्वात सुनिधी परीक्षक म्हणून उपस्थित होती. यावेळी आलेला अनुभव पाहता तिने भविष्यात कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक न होण्याचा निर्णय घेतला. (Sunidhi Chauhan reveals why she is no longer a judge on Indian Idol)

आरजे आणि गायक अमित कुमार यांनीसुद्धा शोवर हाच आरोप केला होता. निर्मात्यांनी सर्व स्पर्धकांचं कौतुक करा असं सांगितल्याचं ते म्हणाले होते. किशोर कुमार यांना समर्पित केलेल्या एपिसोडमध्ये अमित कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याविषयी सुनिधी म्हणाली, "सर्वांचंच कौतुक करा असं नाही म्हणाले, पण हो स्पर्धकांचं कौतुक करण्यास आम्हाला सांगण्यात आलं होतं. यामुळेच मी शोच्या पुढील पर्वात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यांना जे अपेक्षित आहे ते मी करू शकत नाही आणि त्यामुळे मला वेगळा मार्ग निवडावा लागला. याच गोष्टींमुळे मी सध्या कोणत्याच रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी होत नाही."

प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा शोला चांगले व्ह्यूज मिळण्यासाठी परीक्षकांना असं बोललं जात असावं, असंदेखील सुनिधी म्हणाली.

काय म्हणाले होते अमित कुमार?

"मला जे सांगण्यात आलं होतं ते मी केलं. सर्वांची प्रशंसा करा, कौतुक करा असं मला सांगण्यात आलं होतं. कसंही गाणं गायलं तरी त्याचं कौतुक करायचं आहे, असं ते म्हणाले. वडिलांना आदरांजली वाहण्यासाठी हा खास एपिसोड आहे, या विचाराने मी तिथे गेलो होतो. पण अखेर त्यांनी जे सांगितलं तेच मला करावं लागलं", असं अमित कुमार म्हणाले. या शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. "मीडियाशी नंतर बोलण्यापेक्षा, अमितजी यांनी निर्मात्यांना जे जसं आहे तसं स्पष्ट सांगायला हवं होतं", असं तो म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT