esakal | Indian Idol 12: टीमचा मोठा निर्णय; सर्व स्पर्धकांची घरवापसी
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Idol 12

Indian Idol 12: टीमचा मोठा निर्णय; सर्व स्पर्धकांची घरवापसी

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने राज्यातील लॉकडाउन वाढवला आहे. महाराष्ट्रात मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातल्यामुळे या दोन्ही इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 12'च्या Indian Idol 12 टिमने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये शूटिंगला परवानगी नसल्याने या शोचे शूटिंग दमण येथे सुरू होते. पण आता या शोच्या सर्व टिमला मुंबईमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. (indian idol 12 makers take break after shooting one month episode in daman says aditya narayan)

'इंडियन आयडॉल 12'च्या टिमने बॅकअपसाठी काही एपिसोडचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहेत. शूटिंग लवकर पूर्ण झाल्याने सर्व टिमला मुंबईमध्ये पाठवण्यात आले आहे. टीमला सध्या शूटिंगमधून ब्रेक दिला आहे असे शोच्या निर्मात्यांनी सांगितले. या शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याने एका मुलाखतीत सांगितले, 'दमणमध्ये आमच्या टीमने चार दिवसांमध्ये आठ एपिसोड्सचे शूटिंग पूर्ण केले आहे.आमच्याकडे एक महिन्याचे पूर्ण एपिसोड आहेत. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या अनलॉकच्या निर्णयाची वाट पाहात आहोत. तोपर्यंत मुंबईमध्ये राहणे ठीक आहे असे मला वाटते.'

हेही वाचा: आर्थिक संकटात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर चिडले 'नट्टू काका'

'इंडियन आयडॉल 12'मध्ये 12 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी आता 9 स्पर्धक उरले आहेत. पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सवाई भाट, आशीष कुलकर्णी, मोहम्मद दानिश, सायली काबंले, निहाल तारो, शनमुख प्रिया और अंजलि गायकवाड हे स्पर्धक या सिझनमधील सर्वात प्रसिद्ध स्पर्धक आहेत. सध्या शोमध्ये पॉवर प्ले हा नियम सुरू आहे. त्यामुळे शोमधील कोणताच स्पर्धक एक आठवडा एलिमिनेट होऊ शकत नाही.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ