Sunny Deol Bollywood Actor esakal
मनोरंजन

Sunny Deol : सनीची गड्डी सुसाट, तीस वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच दिसणार अब्बास मस्तान सोबत!

सनीच्या गदर २ ला मिळालेले यश आता लपून राहिलेलं नाही.तब्बल २१ वर्षानंतर त्याचा गदर २ प्रदर्शित झाला होता.

युगंधर ताजणे

Sunny Deol Bollywood Actor : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. हजार कोटींची कमाई करत त्यानं वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या चित्रपटानंतर सनीच्या वाट्याला वेगवेगळ्या बॅनरचे चित्रपट आले आहेत.

सनीच्या गदर २ ला मिळालेले यश आता लपून राहिलेलं नाही.तब्बल २१ वर्षानंतर त्याचा गदर २ प्रदर्शित झाला होता. त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. केवळ भारतातच नाहीतर जगभरातून गदरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. देशातील वेगवेगळ्या राज्यांतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर या चित्रपटाचा तिसरा भागही येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

सनी येत्या काळात रामायणावर आधारित एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यात तो हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. आता सनी दिग्दर्शक अब्बास मस्तान यांच्याबरोबर काम करणार आहे. अब्बास मस्तान एका थ्रिलर चित्रपटावर काम करत आहेत आणि त्यामध्ये सनी काम करणार आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत अब्बास मस्तान ही जोडी सस्पेन्स थ्रिलर, तसेच अॅक्शन चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी ओळखली जाते. त्यांनी आतापर्यंत कित्येक यशस्वी चित्रपट दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अब्बास मस्तान आणि सनी देओल यांच्यामध्ये एका प्रोजेक्टबाबत चर्चा सुरू होती. त्यातच ‘गदर २’ च्या भरघोस यशानंतर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली होती.

आता निर्माते विशाल राणा आणि दिग्दर्शक अब्बास मस्तान यांनी ॲक्शन थ्रिलर चित्रपटासाठी सनी देओलची निवड केली आहे. विशाल राणा यांच्या एचेलॉन प्रॉडक्शन अंतर्गत सनीचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट पुढील वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे.अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल तिपटीने वाढले; चालकांमध्ये नाराजी

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT