swanandi tikekar and ashish kulkarni kelvan photos viral with sukanya mone and manjiri bhave SAKAL
मनोरंजन

Swanandi Tikekar: आशिष - स्वानंदीचं केळवण, सुकन्या मोनेंनी दोघांच्या नावाचा बनवला 'हा' खास हॅशटॅग

स्वानंदी टिकेकरच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

Devendra Jadhav

Swanandi Tikekar - Ashish Kulkarni Wedding Update: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी काहीच दिवसांपुर्वी साखरपुडा केला. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाची आता सर्वांना उत्सुकता आहे.

अशातच स्वानंदी - आशिष कुलकर्णीची लगीनघाई सुरु झालीय. स्वानंदी - आशिषचं पहिलं केळवण झालंय. स्वानंदी - आशिषच्या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

आशिष - स्वानंदीचं केळवण

आशिष - स्वानंदीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या केळवणाचा खास बेत अभिनेत्री सुकन्या मोनेंनी आखलेला दिसतोय. याशिवाय अभिनेता सुबोध भावेची बायको मंजिरी भावे सुद्धा केळवणाला उपस्थित होते.

केळवणाला स्वानंदी - आशिषने धम्माल केलेली दिसली. स्वानंदीचा मित्र आणि अभिनेता संचित चौधरी सुद्धा यावेळी उपस्थित होता.

"आणि countdown ला सुरुवात. तुम्ही सर्वांनी आमच्या केळवणाची झक्कास सुरुवात केलीय. आता रांग लागलीय", अशा शब्दात स्वानंदीने केळवणाची माहिती सर्वांसोबत शेअर केली.

याशिवाय स्वानंदी आणि आशिष या नवविवाहीत जोडप्याला अभिनेत्री सुकन्या मोनेंनी खास नाव ठेवलंय. दोघांचं नाव एकत्र करुन सुकन्या यांनी आनंदी हा हॅशटॅग बनवला आहे.

हा हॅशटॅग बनवल्याबद्दल स्वानंदीने सुकन्या मोनेंचे आभार मानले आहेत.

स्वानंदी आणि आशिष लग्न कधी करणार?

येत्या डिसेंबरमध्ये स्वानंदी व आशिष हे लग्न बंधणात अडकणार आहे , त्याचे लग्न पुण्यातच होईल. स्वानंदी आणि आशिष या दोघांचे कुटुंबही पुण्याचेच आहे. त्यामुळे लग्नासाठी पुणे हेच उत्तम ठिकाण असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्वानंदीचे बाबा उदय टीकेकर यांच्या म्हणण्यानुसार, स्वानंदी आणि आशिष हे डिसेंबरमध्ये पुण्यात लग्न बंधनात अडकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT