Swanandi-Ashish Wedding: "लक्ष असू द्या बाबाजी," स्वानंदी व आशिषचे लग्न कधी, कुठे होणार? वडिलांनीच केला खुलासा

उदय टीकेकर यांनी त्यांच्या चाहत्यांना स्वानंदी व आशिषचे लग्न कधी व कुठे होणार याची अपडेट दिली आहे.
Actor Uday Tikekar open up about Daughter Swanandi Tikekar and Ashish Kulkarni marriage date and venue
Actor Uday Tikekar open up about Daughter Swanandi Tikekar and Ashish Kulkarni marriage date and venue

Actor Uday Tikekar: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने नुकतंच गायक - संगीतकार आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले.

काही दिवसांपुर्वी दोघांनी फोटो शेयर करत नातं जाहिर केलं आणि त्यानंतर दोन दिवसात साखरपुडा उरकवला. दोघांचे चाहते त्यांच्यासाठी खुप आनंदी आहेत. आता स्वानंदी अन् आशिष हे लग्न कधी करणार असा प्रश्न सध्या चाहते दोघांना विचारत आहे. २३ जुलै सारखपुडा उरकला आणि आता लग्नाची तयारी सुरु झाल्याचं बोललं जातं आहे.

Actor Uday Tikekar open up about Daughter Swanandi Tikekar and Ashish Kulkarni marriage date and venue
Kangana Ranaut : 'तो पैसे फेकून काहीही करायला लावतो अन् आपण ते पाहतो!'

स्वानंदी ही खुप लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आत्तापर्यंत अनेक नाटक आणि मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची लेक आहे. आता लेकीचं लग्न कधी असा प्रश्न तिचे वडिल अभिनेते उदय टिकेकर यांना विचारण्यात आला आणि यावर त्यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.

Actor Uday Tikekar open up about Daughter Swanandi Tikekar and Ashish Kulkarni marriage date and venue
Celina Jaitley Controversy: 'तू तर बाप-लेकासोबतच...', पाकिस्तानी समीक्षकाला सेलिनावर केलेलं वक्तव्य पडलं महागात, प्रकरण थेट परराष्ट्र मंत्रालयात

स्वानंदी व आशिषने साखरपुड्याचे फोटो शेयर केले, लग्नाबाबत काही माहिती दिली नाही. मात्र लवकरच लग्न करणार असं ती म्हणाली होती. त्यामुळे चाहत्यांना दोघांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्याची उत्सूकता आणखीणच वाढली होती. आता यावर उदय टीकेकर यांनी त्यांच्या चाहत्यांना दोघांचे लग्न कधी व कुठे होणार याची अपडेट दिली आहे.

(Swanandi-Ashish Wedding)

Actor Uday Tikekar open up about Daughter Swanandi Tikekar and Ashish Kulkarni marriage date and venue
Bigg Boss OTT 2: 'एल्विशला उगाच त्रास देऊ नको नाहीतर..' सलमानला थेट गोल्डी ब्रारनेचं दिली धमकी? ट्विट व्हायरल

येत्या डिसेंबरमध्ये स्वानंदी व आशिष हे लग्न बंधणात अडकणार आहे , त्याचे लग्न पुण्यातच होईल. स्वानंदी आणि आशिष या दोघांचे कुटुंबही पुण्याचेच आहे. त्यामुळे लग्नासाठी पुणे हेच उत्तम ठिकाण असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुलीचं लग्न हे सगळ्या पालकांचे स्वप्न असते. तसचं काहीस उदय टिकेकर यांचही असेल. आता मुलीचं लग्न होणार या विचाराने उदय टिकेकर थोडे भावुक होत असले तरी स्वानंदी लग्न करून गेल्यावर तेव्हा ते भावुक होणार नाहीत असं ते म्हणाले.

कारण सांगत ते म्हणतात की, ते तिघेही आतापर्यंत कामामूळे एकमेकांपासून दूर रहायचे. देवाची कृपा आहे की स्वानंदी चांगल्या कुटुंबात जाणार आहे. तिला चांगला मुलगा मिळाला आहे. त्यांनाही चांगली मुलगी मिळाली आहे.

उदय टीकेकर यांच्या म्हणण्यानुसार आता स्वानंदी आणि आशिष हे डिसेंबर पुण्यात लग्न बंधनात अडकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com