swara bhaskar suprise baby shower by husband fahad ahmad
swara bhaskar suprise baby shower by husband fahad ahmad  SAKAL
मनोरंजन

Swara Bhaskar: फहादने स्वराला दिलं बेबीशॉवरचं खास सरप्राईज! नाईट ड्रेसमध्ये स्वराचं सेलिब्रेशन.. व्हिडिओ व्हायरल

Devendra Jadhav

Swara Bhaskar Baby Shower News: स्वरा भास्कर सध्या तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्कर सोशल मिडीयावर सध्या प्रचंड सक्रीय आहे.

अशातच स्वराचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. यात स्वराला तिचा नवरा फहाद अहमदने खास सरप्राईज दिलंय. स्वराचे मित्र आणि कुटंबाच्या उपस्थितीत तिचं डोहाळेजेवण पार पडलं.

(swara bhaskar suprise baby shower by husband fahad ahmad)

स्वराचं नाईट ड्रेसवर खास डोहाळेजेवण

स्वराने तिच्या सरप्राईज बेबी शॉवरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केलाय. याशिवाय अनेक फोटो शेअर केलेत.

या व्हिडिओमध्ये, स्वरा तिच्या पतीसह रुममध्ये प्रवेश करते आणि प्रत्येकाला पाहून ती आश्चर्याने ओरडते. स्वराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "मला सरप्राईज आवडतात. गेल्या आठवड्यात, माझे एक जुने मित्र समर नारायण आणि फहाद यांनी मला बेबी शॉवरच्या रूपात सर्वात गोड सरप्राईज दिले. माझ्या नकळत त्यांनी प्लॅन आखला आणि अंमलात आणला"

स्वराने मानले पतीचे आभार

स्वरा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत पुढे म्हणाली, 'मला अजिबात कल्पना नव्हती आणि मी पायजमा घालून आले. मी गोंधळून गेले. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. समर आणि लक्षिता, या सुंदर नियोजनाबद्दल खूप विचार केल्याबद्दल आणि ते कार्यान्वित केल्याबद्दल धन्यवाद.

याशिवाय हा सर्व प्लॅन गुप्त ठेवल्याबद्दल फहादचेही आभार. त्यासोबत त्यांनी पुढे लिहिले की, हे येणारे बाळ खूप भाग्यवान आहे ज्याला असे प्रेमळ मामा-काकू, आजी-आजोबा आहेत. स्वराने सर्वांचे आभार मानले आणि स्वतःला नशीबवान म्हटले.

प्रेग्नंसी फोटोशूटवर स्वरा भास्कर झाली ट्रोल

याआधी स्वराला तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटमुळे चांगलंच ट्रोल व्हावं लागलं. या फोटोमध्ये स्वराने भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. इतकंच नाही तर तिच्या बॅकग्राउंडला देखील भगव्या रंगाचेच पडदे वापरण्यात आले आहे. स्वराचे हे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला खुप ट्रोल केले आहे.


या ड्रेस आणि फोटोची बॅकग्राउंड पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खुप ट्रोल केलं आहे. तिच्या फोटोंवर कमेंट करतांना एका यूजरने लिहिले की, 'स्वरा बॅकग्राउंड भगव्या रंगाचा अंध भक्तांचा आणखी किती अपमान करणार?' तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'ही प्रथा पूर्णपणे मूर्खपणाची आहे. हे थांबवलं गेलं पाहिजे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT