Tejasswi Prakash Debut In Marathi Movie with Abhinay Berde Instagram
मनोरंजन

बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश मराठीत, अभिनय बेर्डेसोबत दिसणार रोमान्स करताना

बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन 6 ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी सिनेमा 'मन कस्तुरी रे' ४ नोव्हेंबर रोजी आपल्या भेटीस येत आहे.

प्रणाली मोरे

Tejasswi Prakash Debut In Marathi Movie: बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन 6 ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी सिनेमा मन कस्तुरी रे प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत संस्कार -धरोहर अपनों की, स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर, पहरेदार पिया की, सिलसिला बदलते रिश्तों का, नागिन अशा हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तेजस्वीच्या चाहत्यांसाठी तिचा हा मराठी सिनेमा एक ट्रीट असेल. तेजस्वी सोबत या सिनेमात अभिनय बेर्डे आहे.ती सध्या काय करते, अशी ही आशीकी आणि रम्पाट नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक सिनेमाची त्याच्या फॅन्सना उत्सुकता आहे.(Tejasswi Prakash Debut In Marathi Movie with Abhinay Berde)

चंचल मनाची प्रेमकथा, असं मन कस्तुरी रे सिनेमा बद्दल म्हणता येईल. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन संकेत मानेनी (खारी बिस्कीटचा लेखक) केले आहे. तर अनेक वेगवेगळे मराठी सिनेमा आणणा-या नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मुव्ही स्टुडिओजने याची प्रस्तुती केली आहे. मुंबई मुव्ही स्टुडिओज यांनी आत्तापर्यंत मराठीत लोचा झाला रे , शेरशिवराज, मल्याळममध्ध्ये पाथम वळवू असे वेगवेगळे सिनेमा आणले आहेत

गदर, रुस्तम, सैराट, शेरशिवराज-स्वारी अफजलखान या यशस्वी सिनेमांनंतर आता ‘मन कस्तुरी रे’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. त्याचबरोबर वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी मन कस्तुरी रे या सिनेमाची निर्मीती केली आहे. निशीता केणी आणि करण कोंडे हे या सिनेमाचे सहनिर्मीते आहेत. तर यूएफओ मूव्हीज या सिनेमाचे वितरक पार्टनर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT