The Archies Premire attend Amitabh Bachchan Shah Rukh Khan Jaya Bachchan esakal
मनोरंजन

The Archies premier : चला चला आपल्या मुलांचा चित्रपट पाहण्याची वेळ झाली! अमिताभ यांच्या नातवाचं, किंग खानच्या लेकीचं डेब्यू

७ डिसेंबर रोजी झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युगंधर ताजणे

The Archies Premire attend Amitabh Bachchan Shah Rukh Khan Jaya Bachchan : किंग खान शाहरुखच्या लेकीचं सुहाना खानचं आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नातवाचं अगस्य नंदा तसेच श्रीदेवीच्या दुसऱ्या मुलीचं खुशी कपूरचं बॉलीवूडमध्ये पदार्पण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या डेब्यूची चर्चा रंगली होती.

सुहाना, अगस्त्य आणि खुशीचा बहुचर्चित द आर्चीजच्या प्रीमिअरची चर्चा होत आहे. त्याला बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, किंग खान शाहरुख खान, ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन या शिवाय इतर काही सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहे. The Archies Premire attend Amitabh Bachchan Shah Rukh Khan Jaya Bachchan

७ डिसेंबर रोजी झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याची चर्चा रंगली होती. काल त्याचा खास प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी बच्चन परिवार आणि कपूर परिवार यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी दिसून आले. ज्यात ऋतिक रोशनसह त्याची गर्लफ्रेंड सबा आझादही उपस्थित होती.

बिग बी अमिताम बच्चन हे आपला नातू अगस्त्य नंदाला सपोर्ट करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत जया बच्चनही दिसून आल्या. याशिवाय अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, आराध्या बच्चन यांनी अगस्त्य सोबत पोझ देत फोटो काढल्याचे दिसून आले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तसेच अगस्त्य नंदाची आई श्वेता बच्चन नंदा आणि निखिल नंदा यांनी देखील उपस्थिती लावली होती.

सुहानाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं कुटूंब आलं होतं. सुहानानं द आर्चीजमध्ये वेरोनिकाची भूमिका साकारली आहे. वेरोनिका ही एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. जी लंडनवरुन रिवरडेल हिल स्टेशनला येतो. आणि तिथे तिची मैत्री आर्ची अन् तिच्या मित्रांशी होते. या चित्रपटाच्या प्रीमिअरला शाहरुख खाननं हजेरी लावली होती. त्याचबरोबर गौरी खान, आर्यन आणि अबराम खान देखील आले होते.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खूशी कपूरनं या चित्रपटातून डेब्यू केलं आहे. त्याची खास चर्चा आहे. तिनं या चित्रपटामध्ये बेटी कूपर नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT