The Great Indian Murder Trailer 
मनोरंजन

The Great Indian Murder: छत्तीसगढच्या गृहमंत्र्यांच्या मुलाची हत्या

ओटीटीवर (OTT) सध्या एका मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या वेब सीरिजचं नाव द ग्रेट इंडियन मर्डर (The Great Indian Murder Trailer) असं आहे.

सकाळ डिजिटल टीम

ओटीटीवर (OTT) सध्या एका मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या वेब सीरिजचं नाव द ग्रेट इंडियन मर्डर (The Great Indian Murder Trailer) असं आहे. सध्या या मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील मालिका, चित्रपट प्रदर्शित झाले आहे. त्याची प्रेक्षकांनी दखलही घेतली आहे. यामध्ये प्रामुख्यान क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स, पॉलिटिकल ड्रामा याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीला प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली आहे. कायदा, सुव्यवस्था या विषयालाही ओटीटीवर प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. The Great Indian Murder Trailer viral on social media

स्कॅम 1992 मध्ये हर्षद मेहताची (Scam 1992 fame Harshad Mehta) भूमिका करणारा प्रतिक गांधी हा मालिकेमध्ये दिसणार आहे. त्याने या मालिकेमध्ये केलेल्या कामाचं कौतूक प्रेक्षकांनी ट्रेलर पाहून केले आहे. त्याच्यासोबत बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा देखील दिसणार आहे. तिनं डीसीपी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. हे दोघे मिळून छत्तीसगढमध्ये गृहमंत्र्याच्या मुलाची जी हत्या झाली त्या प्रकरणाचा तपास करताना दिसत आहे. थोड्या वेळापूर्वी या मालिकेचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. तो पाहून प्रेक्षकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या गृहमंत्र्याच्या मुलावर दोन आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होता. आणि आता त्याची कुणी हत्या केली आहे.

क्राईम, थ्रिलर या प्रकारातील द ग्रेट इंडियन मर्डरनं आता चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिचा चढ्ढा, प्रतिक गांधी सोबत यामध्ये प्रख्यात अभिनेता आशुतोष राणाही दिसणार आहे. त्यानं बऱ्याच दिवसांनंतर ओटीटीवर पुनरागमन केलं आहे. यापूर्वी ते एका बॉलीवूडच्या चित्रपटामध्ये दिसले होते. या सीरीजचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते तिग्मांशु धुलिया यांनी केलं आहे. तिग्मांशु हे त्यांच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहे. त्यांच्या यापूर्वीच्या चित्रपटांचा विषय क्राईम, थ्रिलर असा असल्याचे दिसून आले आहे. ही सीरिज विकास स्वरुप यांच्या सिक्स सस्पेक्ट्सवर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT