हर्षद मेहता : एक शापित कुबेर

विशाल नामदेव क्षीरसागर
Monday, 30 November 2020

स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज नुकतीच आली आहे. १९९२ मध्ये स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांनी केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित आहे. यातील एका संवाद प्रमाणे "मै सिगारेट  तो नही पीता लेकिन जेबमें लायटर जरूर रखता हू, धमाका करने के लिए. या वेब सिरीजनेही सध्या मनोरंजन क्षेत्रात एकच धमाका उडवून दिला आहे.

स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज नुकतीच आली आहे. १९९२ मध्ये स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांनी केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित आहे. यातील एका संवाद प्रमाणे "मै सिगारेट  तो नही पीता लेकिन जेबमें लायटर जरूर रखता हू, धमाका करने के लिए. या वेब सिरीजनेही सध्या मनोरंजन क्षेत्रात एकच धमाका उडवून दिला आहे.
वेब सिरीजची सुरुवातच मुळात एखाद्या रहस्यमय कथेप्रमाणे सुरू होऊन शेवट जरी अपेक्षित रित्या असला तरी तो पाहणे खूपच मनोरंजक ठरते. अतिशय अभ्यासपूर्ण व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पत्रकार व लेखिका सुचेता दलाल व देवाशिष बसू यांच्या The Scam: Who Won, who Lost, who Got Away या  पुस्तकावर ही वेब सिरीज आधारित आहे. त्यास हंसल मेहता यांनी चार चाँद लावले आहे व यातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, संवाद लेखन, पटकथा लेखन यांनी अत्यंत मेहनतीने ही वेब सिरीज बनवलेली आहे. यातल्या इश्क है तो रिस्क है या संवादाप्रमाणे ही वेब सिरीज बनवण्यात कलावंतांनी निर्मात्यांनी जी 'रिस्क 'घेतलेली आहे त्यावर नक्कीच प्रेक्षक 'इश्क' करून फिदा होतात.

तसे पहायला गेले तर शेअर मार्केट ही संकल्पना अजूनही भारतात जास्त प्रमाणात रुजलेली नाही व तसा तो क्लिष्ट विषय समजला जातो. यात होणारे चढ-उतार नेहमीच सामान्य माणसाची मती गुंगवून टाकते. परंतु अशा क्लिष्ट विषयाला हात घालून दिग्दर्शकाने अत्यंत सोप्या प्रकारे बाजारातील बँक रिसिट, एसजीएल, बुल, बीयर इत्यादी संज्ञाचा, संकल्पनाचा वापर करून सामान्य प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत मांडणी केली आहे. ज्यामुळे हे स्कॅम नक्की काय होते. हा अनुत्तरीत राहिलेला प्रश्न ज्यांनी थेट पंतप्रधान सारख्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीला सुद्धा यामधून सोडले नाही याविषयी उकल होण्यास व तेही मनोरंजक पद्धतीने मदत होते.
ही कथा आहे एका सामान्य गुजराती कुटुंबात जन्मलेल्या हर्षद जो from rags to riches म्हणजेच गरिबीतून श्रीमंतकडे जाणाऱ्या प्रवासाचे वर्णन आहे .सुरवातीच्या काळात घाटकोपरच्या एका सामान्य चाळीत हे  कुटुंब वसले होते. ज्यात हर्षदच्या वडिलांना धंद्यामध्ये तोटा झाल्याने उद्विग्न झालेले असतात. तशातच त्याच्या दोन मुलांना लग्न झाल्यावर अडगळीची जागेमध्ये कसेबसे राहत असतात. या गरिबीला कंटाळून हर्षद अनेक उद्योगधंदे छोटे- मोठे उद्योग करून पाहतो व कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवण्याचा इमानेइतबारे प्रयत्न करत असतो. परंतु त्याला त्यात सतत अपयश येत असते. अशातच एकदा त्याला शेअर बाजारात जॉबर म्हणून नोकरी लागते. ज्यामध्ये सुरुवातीलाच बोहणीच्या वेळेला त्याला तोटा सहन करावा लागतो. यामुळे त्याचा मालक असला धंदयात खोटी करणारा जॉबर नको म्हणून काढून टाकण्याचे सुचवितो, तेव्हा हर्षद त्याला म्हणतो 'मार्केट में सबसे बडा जोखीम तो जोखीम ना लेना है'.
असं म्हणत सुरवातीच्या काही अपयशातून तावून सलाखून हर्षद हळूहळू शेअर बाजारात प्राथमिक धडे शिकत अनुभव घेत असतो. परंतु या धंद्यात सतत अत्यल्प प्रॉफिट होत असल्याने हर्षदला त्याचा कंटाळा येऊ लागतो. यावर तो त्याच्या मित्राला समजावून सांगतो की इनसायडर ट्रेडींग, कन्सल्टंसी या मार्गाने आपण जास्त लाभ कमाऊ शकतो. हर्षद याच्या व्याख्येनुसार ओल्ड स्कूल हो या न्यू स्कूल, सब के सिलॅबस मे एक सब्जेक्ट कॉमन होता है - प्रॉफिट .
या प्रॉफीटच्या ध्यासापायी हर्षद  शेअर बाजारातील प्रस्थापित लोकांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या पंगा घेऊन आपला जम बसवू लागतो व त्याने देऊ केलेल्या लाभामुळे अनेक छोटे छोटे व उपेक्षित डीलर्स त्याला साथ देऊ लागतात . त्यामुळे त्याला अधिक आत्मविश्वास निर्माण होतो " मी या शेअर बाजारातील सागर आहे व प्रत्येक सामान्य माणसांनी येऊन थोडे तरी मिठाचा स्वाद घ्यावा व प्रॉफिट कमवा "असे त्याचे मत असते . 'हर्षद भाईना  राजमा , मार्केट मजामा ' या उक्तीप्रमाणे त्याचे सर्व गुंतवणुकदार  अल्पावधीत लाभ कमवू लागतात .
हर्षदच्या जास्तीत जास्त प्रॉफिट कमावण्याच्या नादात त्याचा रिस्क  फॅक्टर सुद्धा हळू वाढू लागतो ; जे त्याला या स्पर्धेत घातक ठरू लागते .यासाठी तो कोणत्याही प्रचलित नियमाला तसेच कायद्याला न जुमानता कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते . याच वेळी दुसरीकडे प्रस्थापित झालेले मंदीवाले ब्रोकर्स तसेच इतर बँकाचे स्पर्धक त्याच्यावर डूख धरून असतात आणि तिसरीकडे रिझर्व बँक ऑफ इंडिया वर्तमानपत्र तसेच सीबीआयइत्यादी संस्था त्याचे बेकायदेशीर अनियमित व अनैसर्गिक शेअर बाजार च्या वाढीला गती देणाऱ्या या बिग बुलला वेसन घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असतात .भारतात उदारीकरणाचे व जागतिकरणाचे वाहणाऱ्या नव्या वाऱ्याचा फायदा घेत शेअर मार्केटमध्ये बिग बुल ठरल्यानंतर मनी मार्केटच्या महासागरात मुसंडी मारण्याकरता हर्षद छोटे छोटे बँक जे या विदेशी बँक किंवा मोठे दलाल यांच्या नीतीमुळे प्रवाहाबाहेर फेकलेली असतात .अशा वंचित बँकांना सोबत घेऊन हर्षद मेहता या शिकारीचे जाळे तोडण्यासाठी एकत्रपणे छोट्या पक्षाच्या थव्यांना एकत्र घेऊन ही चतुर चिडीया शेअर बाजारात उंच उंच उडू लागते .यासाठी तो हळूहळू एसबीआय, यूटीआय ,नॅशनल हाऊसिंग बँक यासारख्या मोठ्या सरकार पुरस्कृत बँकांनाही आपल्या ' प्रॉफिट' च्या जाळ्यात ओढू लागतो . बँकिंग व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून येऊ लागल्यामुळे आरबीआय सारख्या सर्वोच्च बँक याचा शोध घेऊ लागते . हर्षदचे उंच उडणारे पतंगास कापण्यासाठीव त्यास जमिनीवर आणण्यासाठी सीबीआय चा जेव्हा प्रवेश होतो तेव्हामोठ्या प्रमाणात हर्षदच्या साम्राज्यास धक्के मिळणे सुरु होते  . माधवन तारखा कर्तव्यनिष्ठ सीबीआय अधिकारी त्याच्या 16000 स्क्वेअर फुट अलीशान बंगल्यातून त्याची रवानगी जेव्हा तुरुंगात करतो तेव्हा हर्षद च्या  अस्तास  सुरुवात होते .यातूनच या घोटाळ्यामधून राजकारण सुरू होते तसेच बडे व्यापाऱ्यांचे मक्तेदारी (कार्टल )टिकवण्यासाठी चाललेली धडपड दिसून येते .ज्याचा  शेवटी पंतप्रधानाच्या कार्यालयाशी संबंध जोडला जातो . व या शापित कुबेराचा अंत जवळ येतो .सुरुवातीच्या काळात हर्षदचे जे मित्र असतात तेच पुढे त्याला सोडून जाऊ लागतात व यातले काही जण मरणाचा मार्ग देखील पत्करतात .
यातूनही ही तावून-सुलाखून जेव्हा हर्षद तुरुंगातून सुटतो तेव्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याचे स्वप्न अजूनही पाहत असतो .मात्र सीबीआय ,राजकारण ,वर्तमानपत्र , व्यापारी यांच्या दृष्ट चक्राच्या फेऱ्यातून तो पुरता अडकलेला असतो .यातूनच त्याचा करुण अंत जवळ येतो .
या वेब सिरीज मध्ये सर्वच कलावंतांनी समरसून काम केलेले आहे .हर्षदला शेवटपर्यंत साथ देणारे त्याच्या कुटुंबातील पत्नी, आई तसेच वारंवार हर्षद यास सावध करणारा व नंतर कायदेशीर लढाई जिंकण्यासाठी उतारवयात कायद्याचे पदवी घेणारा भाऊ यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका चोख पार पडल्या आहेत .तसेच आरबीआयचे गव्हर्नर या भूमिकेत अनंत महादेवन ,  दलाल सतीश कौशिक आहेत . तसेच यूटीआय प्रमुख अधिकारी त्यास  म्हणतो की 'या जगात विश्वास  अजूनही अशी गोष्ट आहे जी खूप महागडी वस्तू समजली जाते' .  कर्तव्यनिष्ठ , तडफदार सीबीआय अधिकारी माधवन (रजत कपूर ) यांनी तर यांची वेब सिरीज मध्ये जान आणली आहे . तसेच टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रातील धाडसी पत्रकार सुचेता दलाल (श्रेया धन्वंतरी ) हिने आदर्श व धाडसी  पत्रकाराची भूमिका चोखपणे पार पाडले आहे .हर्षद चा मित्र प्रणव याने बेरकीपणा चांगला दाखवला आहे ;जो त्याच्या बापाला ही फुकट मध्ये सल्ला देणार नाही इतका व्यवहारी पणा त्याच्यात असतो .केडी ,त्यागू यांनी व्यापारामध्ये त्यांचे हुकूमशाही कायम ठेवण्यासाठी त्यांचा' अटीट्युड 'व मुत्सद्दीपणा छान रंगवला आहे .परंतु या सगळ्यात बाजी मारली आहे.

ती हर्षद मेहताच्या मुख्य भूमिकेत असलेल्या प्रतिक गांधी या नवख्या कलाकाराने . सुरुवातीला गरिबीने त्रस्त असलेला व नंतर नवकोट नारायण झालेल्या हर्षद ची भूमिका त्याने अगदी पारंगत अभिनेता प्रमाणे अप्रतिम साकारलेली आहे .हर्षद च्या भूमिकेत तो इतका समरसून गेला आहे की आपण प्रत्यक्ष खऱ्या हर्षदलाच पाहत आहोत असा भास होतो ..कुटुंबवत्सल तसेच प्रेमळ पती ,मुलगा, भाऊ या भूमिकेत हर्षद मस्तपणे रंगवले आहे .इश्क है तो रिस्क है असे म्हणत रिस्क घेणारा सुरुवातीचा चाळीतला हर्षद ते अलीशान  व प्रतिष्ठीत लीनक्स कार घेणारा , भारतातील सर्वात मोठा करदाता, महत्वाकांक्षी  व्यापारी , स्टॉक मार्केटमधील अमिताभ बच्चन  व प्रसंगी पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा धमकी देणारा हर्षद आपल्याला अचंबित करून सोडतो .  त्याच्यावर असंख्य खटले दाखल झाल्याने हतबल हर्षद उद्विग्न होऊन म्हणतो की 'आता फक्त माझ्यावर स्टॉक मार्केट बॉम्बस्फोट ( १९९३ ) हा सुद्धा मीच केला एवढाच आरोप तेवढा बाकी राहिला आहे '. .शेवटचा त्याचा करूण अंत त्याने अप्रतिम रित्या साकारला आहे.

एकूणच हि वेब सिरीज खूपच शिकवून जाण्या जोगी आहे  अचिंत ठक्कर याचे पार्श्वसंगीत खूपच  वेगवान व अर्थपूर्ण आहे तसेच यातील चुरचुरीत संवाद  ,पटकथा सर्वच बाबी उत्कृष्टपणे साकारले आहे . हि वेब सिरीज सुरू होताना दोन-तीन मिनिटं सुरुवातीचे धक्कादायक एक वळण सुरू करून शीर्षक संगीत सुरू होते तसेच शेवटही रोचक करून कधीकधी एपिसोड संपताना बॅकग्राऊंड म्युझिक किंवा गाणे यांनी प्रत्येक भाग संपतो , तेव्हा  ते गाणेही अर्थपूर्ण असते .एकंदरीत सर्वच बाबी उत्तम रित्या साकारून दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक अत्यंत अभ्यासपूर्ण सुंदर व अविस्मरणीय कलाकृती रसिकांना दिली आहे यात शंका नाही ..
रसास्वाद

संपादन : अशोक मुरुमकर

इतर ब्लॉग्स