The Kashmir Files News Google
मनोरंजन

The Kashmir Files: अखेर अनुपम खेर यांनी कपिल शर्मा वादावर चुप्पी तोडली

सिनेमात मोठे कलाकार नाहीत हे कारण देऊन प्रमोशनसाठी बोलावलं नाही असा आरोप दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'द कपिल शर्मा शो' वर केला होता.

प्रणाली मोरे

सध्या सगळीकडे 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) सिनेमाची चर्चा सुरू आहे. पण प्रदर्शनाआधीच सिनेमा अनेक कारणांमुळे,वादांमुळे चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री( Vivek Agnihotri) यांनी 'कपिल शर्मा शो' विरोधात रागाचा सूर काढला होता. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात मोठे कलाकार नाहीत हे कारण देऊन प्रमोशनसाठी बोलावलं नाही असा आरोप दिग्दर्शक विवेकअग्निहोत्री यांनी 'द कपिल शर्मा शो' वर केला होता. यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कपिल आणि त्याच्या शो चा खरपूस समाचार घेणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. नेटकरी कपिलवर इतके भडकले होते की त्यांनी सोशल मीडियावर कपिलच्या शो ला बॉयकॉट करण्याची मोहिमच राबवली होती. तेव्हा कपिलनं यासंदर्भात स्पष्टिकरण देताना लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, असं काहीच झालेलं नाही हे सांगितलं होतं. पण तरीही कपिल विरोधात बोललं जात होतं. पण आता 'द काश्मिर फाईल्स' सिनेमातील अभिनेते अनुपम खेर यांनी या प्रकरणावर चुप्पी तोडत नेमकं काय झालं होतं याबाबत स्पष्टिकरण दिले आहे.

एका हिंदी न्यूज चॅनलवर मुलाखती दरम्यान अनुपम खेर(Anupam Kher) यांनी 'द काश्मिर फाईल्स' आणि 'कपिल शर्मा शो' यावरनं चाललेल्या वादावरनं पडदा उठवला आहे. त्यांनी याबाबत स्पष्टिकरण देताना सांगितलं की,''द कपिल शर्मा शो मध्ये 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाच्या प्रमनोशनसाठी दोन महिने आधीच मला निमंत्रण आलं होतं. पण मला वाटलं सिनेमाचा गंभीर विषय पाहता 'कपिल शर्मा शो' मध्ये आपण सिनेमाचं प्रमोशन करु नये. मी त्या शो मध्ये गेलो आहे. तो शो विनोदी बाजाचा आहे. तिथे मजा-मस्ती होते. पण 'द काश्मिर फाईल्स' सिनेमातील विषयावरनं विनोद रंगवणं योग्य वाटलं नसतं. कपिलचा शो चांगलाच आहे,पण जेव्हा सिनेमा सत्य घटनेवर आधाऱित असतो,गंभीर धाटणीचा असतो तेव्हा तिथे नं गेलेलं योग्य असं मला वाटलं आणि मी शो च्या टीमला नकार कळवला''.

अनुपम खेर यांच्या या स्पष्टिकरणानंतर कपिल शर्माने(Kapil Sharma) अनुपम खेर यांचे धन्यवाद मानले आहेत. कारण गेली अनेक दिवस या विषयामुळे कपिलच्या विरोधात खूप उलट-सुलट चर्चा रंगवल्या जात होत्या. कपिलने अनुपम खेर यांच्या मुलाखतीची क्लिप शेअर करत त्यांचे स्पष्टिकरण दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. त्यानं म्हटलंय,''आभारी आहे अनुपम पाजी. तुम्ही माझ्या संदर्भातच्या अफवांना उत्तर दिलंत. आणि त्या सगळ्या आपल्या लोकांचे देखील आभार ज्यांनी सत्य समजून न घेता मला प्रेम दिलं? आनंदी रहा,हसत रहा''. द काश्मिर फाईल्स हा सिनेमा हरयाणा,गोवा,मध्यप्रदेश,गुजरात राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तसंच,अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' सिनेमाला तगडी टक्कर देत असल्याचं बोललं जात आहे. बॉक्स ऑफिसवर 'द काश्मिर फाईल्स' चांगली कमाई करत असल्याचं देखील वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT