these marathi celebrities participate in bigg boss marathi season 4  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss Marathi: हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?

हे कलाकार आले तर यंदा 'बिग बॉस' मराठी होणार मोठा राडा..

नीलेश अडसूळ

Bigg Boss marathi season 4 : 'बिग बाॅस मराठी' हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्याचे चौथे पर्व लवकरच सुरु होणार आहे. नुकतेच कलर्स मराठीने एक व्हिडिओ शेअर करत लवकरच बिग बाॅस प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार का, किंवा नेमकं कोण करणार यावरून सुरू झालेल्या चर्चा ताज्या असतानाच आता यंदाच्या पर्वात कोणते कलाकर सहभागी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. एका माध्यमाने सहभागी होणाऱ्या दहाहून अधिक कलाकारांची संभाव्य यादी जाहीर केली आहे.

मराठी मालिका विश्वात 'बिग बॉस' ही संकल्पना रुजेल का याबाबत अनेकांना शंका होती. पण काही वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीत सुरु झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. दैनंदिन मालिकांमधील काल्पनिक कुरघोड्या पाहण्यापेक्षा एका घरात बंद असलेल्या लोकांमध्ये घडणाऱ्या खऱ्या कुरघोड्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या. बघता बघता या मालिकेचे तीन सीजन झालेही आणि आता चौथा सीजन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (bigg boss marathi season 4) विशेष म्हणजे कोणते कलाकार यंदाच्या पर्वात असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहींनी याबाबत तर्क वितर्क देखील सुरू केले आहेत. अशातच एका माध्यमाने संभाव्य कलकरांची नावे जाहीर केली आहेत.

या नावांमध्ये काही मोठ्या कलाकारांचा सहभाग आहे तर काही कायमच चर्चेत असणारे कलाकार आहेत. समोर आलेल्या माहिती नुसार अभिनेत्री अलका कुबल, शुभांगी गोखले, स्वराज्य रक्षक फेम प्राजक्ता गायकवाड, देवमाणूस फेम नेहा खान, सोनल पवार, रुचिरा जाधव, शर्वरी लोहकारे, दीप्ती लेले, गायिका कार्तिकी लेले, 'मुलगी झाली हो' मालिकेवरून वादात अडकलेला अभिनेता किरण माने, 'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक जोशी, ओंकार शिंदे, अनिकेत विश्वासराव, 'लागीर झालं जी' मधील निखिल चव्हाण, यशोमान आपटे, 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अण्णा म्हणजेच माधव अभ्यंकर हे कलाकार संभाव्य यादीत आहेत. हे कलाकार जर खरच 'बिग बॉस मराठी'च्या घरात आले तर मात्र प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

"तुमची गावठी मराठी नाही पाहिजे" कुंडली भाग्यच्या सेटवर दिग्दर्शकाने केलेला कमळी फेम अभिनेत्रीचा अपमान

Latest Marathi News Live Update : युद्धाच्या परिणामामुळे इंधन दरात वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व, चोवीस तास वॉचमन तैनात

SCROLL FOR NEXT