Tiku Weds Sheru Nawazuddin Siddiqui  esakal
मनोरंजन

Tiku Weds Sheru Nawazuddin Siddiqui : मानलं तुला! तुझ्यापेक्षा २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत चक्क 'लिपलॉक'

टीकू वेड्स शेरुचा ट्रेलर चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. मात्र काहींनी नवाझुद्दीनला ट्रोल केले आहे. तसंही तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Tiku Weds Sheru - बॉलीवूडचा स्टार अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी आणि अवनीत कौर यांचा टीकू वेड्स शेरु नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर नवाझुद्दीन ट्रोल होऊ लागला आहे. बॉलीवूडची क्वीन असलेल्या कंगनाची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये नवाझुद्दीननं जे काही केलयं त्याची चर्चा होतेय. Tiku Weds Sheru Nawazuddin Siddiqui lip locked

टीकू वेड्स शेरुचा ट्रेलर चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. मात्र काहींनी नवाझुद्दीनला ट्रोल केले आहे. तसंही तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आला आहे. त्याची पत्नी आलियानं त्याच्यावर केलेले गंभीर आरोप, त्यांच्या घटस्फोटाची रंगलेली चर्चा यामुळे हे दोन्ही सेलिब्रेटी सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रडारवर आले होते.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

नवाझुद्दीनसारख्या अभिनेत्याच्या आयुष्यात अशा प्रकारचे वादळ येऊ शकते हे ऐकून आणि वाचून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता त्याच्या टीकू वेड्स शेरु नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तो पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. याचे कारण नवाझुद्दीननं त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या अवनीत कौर नावाच्या अभिनेत्रीला केलेलं किस. त्यामुळे त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

अवनीत कौर आणि नवाझुद्दीनची वेगळी केमिस्ट्री या नव्या चित्रपटामध्ये दिसून आले आहे. मात्र तो लिपलॉक सीन अनेकांसाठी वादाचे कारण ठरताना दिसतो आहे. नवाझुद्दीनचा तो रोमँटिक अंदाज काही वेगळाच आहे. यापूर्वी देखील काही चित्रपटांमध्ये नवाझुद्दीनचे रोमँटिक अंदाज हा चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. त्यात अनुराग कश्यप दिग्दर्शित गँग्स ऑफ वासेपूर नावाची फिल्म असो किंवा सेक्रेड गेम्स सारखी वेबसीरिज असो. याशिवाय त्यानं बंदूकबाज बाबूमोशाय नावाच्या चित्रपटामध्ये केलेली भूमिका चर्चेचा विषय होती.

कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्सच्यावतीनं हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून त्याचे दिग्दर्शन साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला असून त्यामध्ये नवाझुद्दीनवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे, काहींनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे तर काहींनी त्याचे वय आणि त्या अभिनेत्रीचे वय यांची तुलना करुन त्याला खडेबोल सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT